आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकली म्हणाली, आई माझे पोट एवढे का फुगले आहे? निरुत्तर झाली जन्मदात्री!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 वर्षीय अबोध बालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागतेय. - Divya Marathi
12 वर्षीय अबोध बालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागतेय.
इंदूर - खरगोनच्या टांडाबरूडमध्ये 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. चुलत भावानेच वासनेची शिकार बनवल्याने या अल्पवयीन मुलीला 6 महिन्यांचा गर्भ आहे. तिच्या गर्भपातासाठी कुटुंबीय कोर्टात गेले होते, परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले. शुक्रवारी कोर्टाने आदेश दिले की एक मेडिकल बोर्ड बनवून मुलीची तपासणी करावी आणि सोमवारी कोर्टाला अहवाल सादर करावा. या कायदेशीर बाबींपासून अनभिज्ञ असलेली ही चिमुकली आपले वाढलेले पोट पाहून आईला विचारतेय की, माझे पोट असे का मोठे होत आहे! डॉक्टरांकडे आल्यावरही नीट का होत नाही? मला इथे राहायचेच नाही. घरी कधी नेशील आई?
- आईच काय, तिच्या या प्रश्नांचे उत्तर कुणाकडेच नाहीये.
 
 
- वकील राजेंद्र सिंह परमार म्हणाले, गर्भपातासाठी कनिष्ठ कोर्टात अर्ज दिला होता, परंतु तिथे परवानगी मिळाली नाही. यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो. येथे शुक्रवारी कोर्टाने एक मेडिकल बोर्ड बनवून मुलीची तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे सांगितले आहे. परमार म्हणाले की, पीडितेला सध्या एमवाय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
- पूर्ण कायदेशीर प्रक्रियेपासून अनभिज्ञ असलेली ही 12 वर्षांची अबोध मुलगी शरीरात होणाऱ्या बदलांना पाहून त्रस्त झाली आहे. ती आईलाच आता प्रश्न करतेय की, सांग ना आई, माझे पोट का एवढे वाढतेय? डॉक्टरांनीही तपासले, मग हे पुन्हा का नीट होत नाहीये? मला या हॉस्पिटलमध्ये राहायचे नाही, मला घरी घेऊन चल. मला शाळेत जायचेय. खूप दिवस झाले मैत्रिणींना भेटून, चल ना गं आई!
- मुलीचे हे प्रश्न ऐकून आईच्या डोळ्यात फक्त पाणी जमा होते, शब्द नसतात. मुलीच्या मदतीसाठी चाइल्ड लाइनची टीमही समोर आली आहे. टीमचे सदस्य तिची काउन्सेलिंग करत आहेत.
 
असे आहे पूर्ण प्रकरण
- खरगोनच्या टांडाबरूडमध्ये काही दिवसांपूर्वी 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी 6 महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे प्रकरण समोर आले. तिच्यावर अत्याचार करणारा तिचाच चुलत भाऊ निघाला. नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली, आणि गर्भपाताचा आग्रह धरला. तर डॉक्टरांनी पीडिता आणि अर्भकाच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. यानंतर घरातील मंडळींनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. 

असा झाला खुलासा
- 12 वर्षीय अल्पवयीन म्हणाली की, 6 महिन्यांआधी घराच्या मागेच राहणारा आरोपी लखन दारासिंह जमरे (19) याच्या किराणा दुकानात ती सामान आणायला गेली होती. तेथे लखनने तिला आत बोलावून दरवाजा बंद केला आणि धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने मुलीच्या अबोधपणाचा आणि ती गप्प बसल्याचा फायदा घेऊन अनेक दिवस असाच बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच मुलगी आत्याच्या घरी गेली, तेव्हा अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. दवाखाना केला असता सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...