आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, मग 4 वर्षांनी कोर्टाने दिली ही शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद - गंगापार परिसरात 53 वर्षांच्या अपंगाने एका 14 वर्षांच्या मुलीवर मित्रासह मिळून सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही, तर पुन्हा त्याने मुलीला किडनॅप करून तिच्याशी लग्न केले आणि रोज तिला टॉर्चर करत होता. चार वर्षांनी बुधवारी तिला न्याय मिळाला. जिल्हा न्यायालयाने तिच्या कथित पतीला 75 हजार रुपयं दंडासह 35 वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आहे. गँगरेपमध्ये त्याच्या मित्राला 10 वर्षे कैद आणि 30 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकच्या मदतीने वाचा पूर्ण प्रकरण...
 
मुलीचे कुटुंबीय न्याय मिळाल्याने आनंदी...
- किशोरवयीन मुलीच्या घरच्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
- आरोपी पक्षाने याला कट असल्याचे सांगत आरोप केला की, मुलीच्या वडिलांनी तिला 6 लाखांत विकले होते. या आरोपाला कोर्टाने फेटाळून लावले. कारण 6 लाख रुपये दिल्याची बाब आरोपी पक्षा सिद्ध करता आली नव्हती.
 
52 महिन्यांनंतर मिळाली 57 वर्षांच्या आरोपीला शिक्षा
- 9 ऑगस्टला इलाहाबाद डिस्ट्रिक्ट कोर्टात न्या. सुनील कुमार यांनी या प्रकरणावर निर्णय सुनावला. सरकारी वकील डी. एस. मिश्रा यांनी गुन्हा सिद्ध करण्यासाठी 5 साक्षीदार सादर केले होते.
- न्या. सुनील कुमार यांनी आरोपी जोखू शुक्ला याला किडनॅप आणि रेपच्या आरोपात 10 वर्षे कैद आणि 30 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
- मुख्य आरोपी उमाशंकर द्विवेदी यांनी बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 25 वर्षे कैद आणि 40 हजारांचा दंड व अपहरणासाठी 10 वर्षे कैद आणि 30 हजारांचा दंड ठोठावला.
- शिक्षा सुनावल्यानंतर लगेच पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि सेंट्रल जेल नैनीला पाठवले.
नोट - इन्फोग्राफिकमध्ये वापरलेले सर्व फोटो प्रतीकात्मक आहेत.
बातम्या आणखी आहेत...