आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म होताच किन्नराकडे सोडून दिली होती मुलगी, लहानाची मोठी करून लावून दिले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - शहराच्या झब्बाल रोडवर चौधरी रिसॉर्टमध्ये होणारे लग्न इतर विवाह समारंभांपेक्षा खूप वेगळे होते. या लग्नात हातात भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ घेतलेले पाहुणे किन्नर डिंपल बाबा आणि त्यांच्या मुलीला लग्नाच्या शुभेच्छा देत होते. तथापि, या मुलीला डिंपल बाबानेच लहानाची मोठी केले होते आणि नुकतेच तिचे लग्न लावून दिले.

 

आई-वडील दोघांचेही प्रेम दिले मुलीला...
- डिंपल बाबाचे नाव या परिसरात प्रसिद्ध आहे.
- लहानपणापासून मुलीसारखे सांभाळलेल्या ज्योतीला बाबाने आईवडील दोघांचेही प्रेम दिले. त्यांनीच तिचे शिक्षण केले. 
- बाबाच्या कुटुंबाचा भाग बनलेली ज्योती त्यांच्या घरासाठी आपल्या नावाप्रमाणेच ठरली.
- डिंपल बाबा म्हणतात, पहिल्या दिवसापासून त्यांनी ज्योतीला स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळले, एखाद्या मुलाचे जेवढे लाड करतात तेवढे ज्योतीचे केले.
- तान्हुली असताना तिला मध चाटवले आणि अंगाई गाऊन झोपीही घातले. तिला भूक लागल्यावर रात्री उठून बॉटलमधून दूधही पाजले.

- बाबा म्हणाले की, ज्योतीची शिकूनसवरून स्वत:च्या पायावर उभी राहण्याची इच्छा होती. म्हणून मीही तिच्या शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नाही.
- ज्योती लग्न करून गेल्याने डिंपल बाबाचे मन उदास आहे, पण म्हणाले- मला ईश्वराने जी जबाबदारी दिली होती, ती पूर्ण केल्याचा आनंद जास्त आहे.

 

ज्योती म्हणाली- देवाचे मानावे तेवढे आभार कमीच
- नववधू ज्योतीसाठी लग्नाचा दिवस सोन्याहून पिवळा ठरला.
- तिची पाठवणी करताना आईवडिलांच्या आठवणीबाबत तिला विचारले तर म्हणाली, डिंपल बाबाने मला आईवडील दोघांचेही प्रेम दिले आहे. त्यांनी मला ज्याप्रमाणे सांभाळले, तेवढी माझ्या खऱ्या आईवडिलांनीही काळजी घेतली नसती.
- मी देवाचे आभार मानते की, मला बाबासारखे आईवडील मिळाले. त्यांनी माझी प्रत्येक इच्छा लाडाकोडात पूर्ण केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ज्योतीबाबत...

बातम्या आणखी आहेत...