चंदिगड - शनिवारी एका विवाहितेच्या खुनाच्या आरोपात अटक झालेला सासरा आणि पतीला कोर्टापुढे हजर करण्यात आले. तिथून त्यांची 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मृत महिलेच्या मुलीने आपल्या आजीला सांगितले की, मम्माला पप्पा, काका, आणि आजीने फॅनला लटकवले होते.
असे केला खुलासा
आजीने 3 वर्षांच्या समायराला विचारले की, बेटा मम्माला कोणी मारले सांग? अगोदर मुलगी म्हणाली, मी नाही सांगू शकत. मग आजी म्हणाली की, तुझ्या मामाला सांगा. तर म्हणाली, पप्पा, काका आणि आजीने तिला पंख्याला लटकवले. पप्पांनी मम्माला फॅनला लटकावल्यानंतर मला धक्का मारून पाडले. समायरा मृत ऋचाची मुलगी आहे.
असे आहे प्रकरण...
- कपूरथळामध्ये ऋचाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ऋचाचे पती आणि सासरच्यांचे म्हणणे होते की, पती अनिलला व्हॉट्सअॅपवर बाय- बाय लिहून तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
- दुसरीकडे ऋचाचे आई-वडील अशोक कुमार यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीची सासू आणि दिराने धर्म बदलला आहे आणि ते तिच्यावरही धर्म परिवर्तन करण्याचा आणि माहेरातून मोठी गाडी आणण्याचा दबाव आणत होते.
- ऋचाने असे करायला नकार दिल्यावर तिला फासावर लटकावून तिचा खून करण्यात आला.
- एवढेच नाही, कपूरथळामध्ये ऋचाची आई नीलम यांनी आरोप केला की, ऋचा 3 महिन्यांची गर्भवती होती. सासरच्यांनीच तिचा गर्भपात केला.
- यावर डॉक्टरांनी ऋचाचे पोस्टमॉर्टम केले.
- कपूरथळाचे एसएमओ डॉ. अनुप मेघ म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही बाबी स्पष्ट झाल्यावर सर्व समोर येईल.
- दुसरीकडे, आरापी सासू-सासरा आणि पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांची 3 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...