आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने आदल्या दिवशी दिला राजीनामा, दुसऱ्याच दिवशी असा आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्मलाचा खून करून तिला बॅगेत पॅक करण्यात आले. - Divya Marathi
निर्मलाचा खून करून तिला बॅगेत पॅक करण्यात आले.
चंदिगड/बद्दी - बद्दी इंडस्ट्रियल एरियात बनलेल्या वर्धमान कॉलनीच्या डस्टबिनजवळ सकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळला. सफाई कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट टीमने मृतदेह बॅगेतून काढला. मृत तरुणीचे नाव निर्मला असल्याचे कळते. पोलिसांनी तिच्या घरी पोहोचून पाहिले असता तेथे लॉक असल्याचे दिसले. निर्मलाचा पती फरार होता.
 
प्रेमसंबंधांचा संशय
- निर्मलाची 5 फुटांपेक्षा थोडी जास्तच असेल. तिला अडीच फूट लांब, एक फूट रुंद, आणि दीड फूट खोल बॅगेत पॅक करण्यात आले होते, पण बॅगेची चेन मात्र लावलेली नव्हती.
- निर्मलाच्या शरीरारवर कुठेही जखमा आढळल्या नाहीत. ज्या बॅगेत तिला पॅक करण्यात आले होते, त्यात एक दोरी आढळली आहे, ज्याला काही केस लागलेले होते.
- पोलिस सूत्रांनुसार, हा खून गुरुवारी रात्री झाला. बहुतेक तिच्या नवऱ्याचे किंवा तिचे काही अवैध संबंध असतील असे सांगितले जात आहे.
 
नेमके कोणासह राहायची निर्मला?, पोलिसांना पडला प्रश्न
- पोलिसांनी निर्मलाच्या घराची झडती घेतली असता आधार कार्ड मिळाले, त्यावर यूपीच्या घराचा पत्ता होता.
- यूपीमध्ये पोलिसांना संपर्क साधता आला नाही. तिच्या या घरात कोणताही मोबाइल नंबर मिळाला नाही.
- पोलिसांना रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते की, निर्मला पतीसह राहायची की इतर कुणासह...
 
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, पूर्ण प्रकरण... 
बातम्या आणखी आहेत...