आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीनेच पतीला शेजारणीवर करायला लावला रेप, म्हणाली- स्वत:ला सिद्ध करायचे होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिताने बलात्कारात पतीची साथ दिली. - Divya Marathi
अनिताने बलात्कारात पतीची साथ दिली.
जांजगीर - स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एका महिलेने आपल्या शेजारणीवर पतीला रेप करायला लावला. ही घटना जांजगीरची आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना लखुर्री गावातील आहे. 40 वर्षीय अनिल कर्षला आपल्या पत्नीवर अनिता कर्षवर संशय होता की तिची शेजारी राहणाऱ्या माणसाशी भानगड आहे.
- यामुळे दोघांत खूप वाद व्हायचे. अनिता नेहमी अनिलच्या आरोपांना नाकारायची आणि त्याला संशयी म्हणायची.
- एक दिवस अनिलने आपल्या पत्नीसमोर एक अट ठेवली. अटीनुसार, तिला शेजारी राहणाऱ्या माणसाच्या बायकोला काहीही बहाणा करून घरी घेऊन यायचे होते.
- आरोपी अनिलने म्हटले की, जर तिने शेजाऱ्याच्या बायकोला आणले नाही तर तिचे शेजाऱ्याशी अवैध संबंध आहे हे मी खरे मानीन.
- म्हणून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अनिताने मजबुरीने शेजाऱ्याच्या पत्नीला घरात आणले.
- काही वेळ तिने शेजारणीला गप्पांमध्ये गुंतवले, मग एका कामाच्या बहाण्याने तिला मागच्या खोलीत पाठवले. तिथे अनिल अगोदर लपून बसलेला होता.
- इकडे शेजारीण खोलीत आली की लगेच अनिल दरवाजाची कडी लावली आणि तिच्यावर बलात्कार केला.
- ही गोष्ट जेव्हा पीडित शेजारणीने घरी जाऊन आपल्या पतीला सांगितली तेव्हा शेजारच्या व्यक्तीने सारागाव पोलिसांत तक्रार दिली.
- पोलिसांनी अनिलला बलात्काराच्या आरोपात आणि त्याच्या पत्नीला कटात त्याची साथ देण्याच्या आरोपात ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. तेथून दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
फोटो : पवन शर्मा
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, प्रकरणाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...