बैकुंठपूर - येथे एका विवाहितेने सखी केंद्रामध्ये समुपदेशनादरम्यान सल्फासच्या गोळ्या गिळल्या. उलट्या झाल्याने तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- पोलिस सूत्रांनुसार, कोरबा येथील रहिवासी ममता (26) चे लग्न 5 वर्षांपूर्वी खरसिया येथील आदर्शशी झाले होते.
- लग्नाच्या दोन वर्षांतच ममताचा पतीशी वाद झाला आणि ती भावजीकडे रामचंद्रपूरला येऊन राहायला लागली.
- इकडे भावजी आणि सालीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. ही गोष्ट जेव्हा ममताची बहीण सरिताला कळली तेव्हा तिचा तोल ढळला आणि तिने सखी केंद्रामध्ये नोटीस देऊन बहीण आणि पतीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
- केंद्रातून सरिता आणि तिच्या सासरचे, सरिताचा पती आणि ममताला बोलावण्यात आले. ममताच्या पतीलाही बोलावण्यात आले होते, पण तो गेला नाही.
- इकडे केंद्राच्या लोकांनी ममताला भावजीची संगत सोडून तिच्या पतीकडे नांदायला जाण्याबाबत समुपदेशन केले आणि प्रकरण येथेच मिटवण्याचा सल्ला दिला.
- ममताची भावजीला सोडून जायची इच्छा नव्हती. परंतु, आता भावजीपासून दूर जावे लागणार हे लक्षात येताच ती बाथरूममध्ये गेली आणि सल्फासचा पूर्ण डबा रिकामा केला. त्यात 7 गोळ्या होत्या.
- तिला उलट्या होऊ लागल्यावर सर्वजण घाबरले आणि लगेच तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.