Home »National »Other State» Aarushi Murder Case CBI Theory, How Talwar Killed Their Daughter And Servant

तलवार दांपत्याने कसा केला होता आरुषीचा खून, ही होती CBI ची थेअरी...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:51 PM IST

नोएडा - मे 2008 मध्ये झालेल्या आरुषी मर्डर केसमध्ये 26 नोव्हेंबर 2013 रोजी सीबीआय कोर्टाने तिच्या मम्मी-पप्पा नूपुर आणि राजेश तलवार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध तलवार कुटुंबाने हायकोर्टात अपील केले होते. 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हायकोर्टाने दोघांना निर्दोष मुक्त केले आहे. 2013 मध्ये ज्या थेअरीच्या आधारे सीबीआय कोर्टाने आरुषीच्या आईवडिलांना शिक्षा सुनावली होती, DivyaMarathi.com ती थेअरीला रिकॉल करत आहे.
काय आहे आरुषी मर्डर केस?
- 16 मे 2008 रोजी नोएडाच्या वायु विहारमध्ये 14 वर्षीय आरुषी तलवार आपल्याच बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा गळा चिरण्यात आला होता आणि डोक्यावर खोल जखम होती.
- आरुषीचे आईवडील डेंटिस्ट आहेत. त्यांनी पोलिसांसमोर त्यांचा नेपाळी नोकर हेमराजवर खुनाचा संशय व्यक्त केला होता.
- गुन्हा दाखल झाल्याच्या पुढच्याच दिवशी तलवार कुटुंबाने छतावरून हेमराजचा मृतदेह हस्तगत केला. त्याचाही गळा चिरण्यात आला होता आणि डोक्यावर वार केल्याच्या खुणा होत्या.
- यानंतर पोलिसांचा संशय थेट आरुषीचे आईवडिलांवर गेला. 1 जून 2008 रोजी त्यांच्याविरुद्ध सीबीआय तपास सुरू झाला.
- 2013 मध्ये सीबीआय अॅडिशनल एसपी एजीएल कौल यांनी स्पेशल कोर्टासमोर आपली रिपोर्ट दाखल केली.
पुढच्या इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, सीबीआयच्या थेअरीनुसार कसा झाला होता आरुषीचा मर्डर...
हेही जरूर पाहा

Next Article

Recommended