आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचा त्रिकाेण बेतला हिरोइनच्या जिवावर, तिचा काटा काढून लव्ह बर्ड गेले सहलीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद - या शहराला तसे तर आपल्या धार्मिक-सांस्कृतिक आणि राजकीय वारशासाठी ओळखले जाते. पण कधी- कधी अशा काही घटना होतात ज्या शहराच्या पावित्र्याला काळिमा फासतात. divyamarathi.com क्राइम सिरीज अंतर्गत 16 मार्च 2012 रोजी घडलेल्या अशा स्टोरीबाबत सांगत आहे, ज्यात एका प्रेमीयुगुलाने बॉलीवूड अॅक्ट्रेस मीनाक्षी थापाचा खून केला होता.
पुढच्या स्लाइड्समध्ये इन्फोग्राफिकद्वारे वाचा, कशी घडली ही भयावह घटना...
 
अॅक्ट्रेस बनण्याआधी डान्स टीचर होती मीनाक्षी थापा
- नेपाळची रहिवासी असलेल्या मीनाक्षी थापाचे वडील ओएनजीसी डेहराडूनमध्ये काम करायचे. मीनाक्षी येथेच शिकली. तिने एव्हिएशनमध्ये डिप्लोमा केला होता. पण तिची आवड डान्स होती. यामुळेच तिने सेंट जोसेफ अकॅडमीमध्ये डान्स टीचर म्हणून काम केले.
- तिचा भाऊ नवराज आर्मीत श्रीनगरमध्ये तैनात होता. आई कमला थापा डेहराडूनला राहायची. तिची आई वन संशोधन संस्थेत काम करायची. दुसरा भाऊ विक्की थापा होता, मोठी बहीण हेमूचे लग्न अजय थापाशी झाले होते.
 
इलाहाबादचा राहणारा होता आरोपी अमित
- आरोपी अमित इलाहाबादचा राहणारा होता. त्याचे वडील वकील होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमितने येथेच कोचिंगचा बिझनेस सुरू केला होता. तिरुपती अकॅडमीत तो डिरेक्टर होता. अमितचे लग्न प्रीती जायसवाल नावाच्या युवतीशी झालेले होते. या लग्नापासून त्याला दोन मुलेही झालेली होती.
- चंदेरी दुनियेला भाळलेला अमित सुरुवातीच्या दिवसांत डान्स क्लास चालवायचा. पर्सनॅलिटी आकर्षक करण्यासाठी तो नियमितपणे जिमवरही जायचा. याच बळावर त्याला भोजपुरी चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. याच शिडीने त्याला बॉलीवूड गाठायचे होते.
 
प्रकरणाचे करंट स्टेटस
- मीनाक्षी थापा हत्याकांडातील दोन्ही आरोपी अमित जायसवाल आणि एल्विन सुरीन यांना मुंबई जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
- पोलिस निरीक्षक सी. पी. तिवारी म्हणाले, मागच्या वर्षी मार्चमध्येच दोघांना शिक्षा झाली होती. दोघांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्जही केलेला आहे. आतापर्यंत यावर निर्णय आलेला नाही. दोघेही सध्या मुंबईतील तुरुंगातच शिक्षा भोगत आहेत.
बातम्या आणखी आहेत...