आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमनंतर आसारामकडे नजरा, पीडितेने सांगितली \'त्या\' रात्रीची हकिगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला 20 वर्षांची कैद सुनावण्यात आल्यानंतर आता सर्वांच्या नजरा अल्पवयीन शाळकरी मुलीच्या लैंगिक शोषणातील आरोपी आसारामच्या केसकडे लागल्या आहेत. राम रहीमपेक्षाही जास्त भक्त आणि पैसा असणारा आसाराम 4 वर्षांपासून जोधपूरच्या जेलमध्ये बंद आहे.
 
असे आहे केसचे करंट स्टेटस...
- आसाराम केसमध्ये सर्व सरकारी साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले आहेत. बचाव पक्षाकडून अगोदर 100 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती. ही घटवून आता 40 करण्यात आली आहे. यातील 25 साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले आहेत. आता काही साक्षी शिल्लक आहेत. सोबतच रोज सुनावणी होत असल्याने लवकरच निर्णय येण्याची अपेक्षा आहे.
 
असे आहे प्रकरण...
- आसारामच्या गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आरोप केला की, 15 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूरच्या जवळील मणाई गावात एका फार्म हाऊसमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
- 20 ऑगस्ट 2013 ला तिने दिल्लीच्या कमलानगर पोलिसांत आसारामविरुद्ध प्रकरण नोंदवले. जोधपूरचे प्रकरण असल्याने दिल्ली पोलिसांनी प्राथमिक नोंद घेऊन तिला जोधपूरला पाठवले.
- जोधपूर पोलिसांनी आसारामविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून आसारामला अटक करून जोधपूरला आणले. तेव्हापासून आसाराम जोधपूर जेलमध्येच बंद आहे.
- यादरम्यान त्याच्याकडून उच्चतम आणि उच्च न्यायालयासहित जिल्हा न्यायालयात तब्बल 9 वेळा जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु जामीन मिळाला नाही.
 
9 साक्षीदारांवर झाले आहेत प्राणघातक हल्ले
- आसाराम प्रकरणी 9 साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले झालेले आहेत. यातील दोघांचा मृत्यूही झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांना शहाजहांपूर आणि जोधपूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेले आहे.
 
10 हजार कोटींचा मालक आसाराम
- आसारामकडे 400 ट्रस्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण साम्राज्यावर त्याचे नियंत्रण होते. आसारामच्या संस्थांकडून विकल्या जाणाऱ्या पत्रिका, प्रार्थना पुस्तके, सीडी, साबण, धूपबत्ती आणि तेल इत्यादी प्रॉडक्टच्या विक्रीतून, श्रद्धावानांच्या देणगीतून, तसेच आश्रमाने हडपलेल्या जमिनीवर शेतीतूनही आश्रमाच्या खजान्यात मोठी रक्कम आली. बेनामी जमिनीचे सौदे आणि तब्बल 2200 कोटी रुपयांहून जास्त रक्कम 500 पेक्षा जास्त लोकांना चढ्या व्याजदराने, तर 1635 कोटी रुपये नगदी कर्ज म्हणून देण्यात आले. अमेरिकी कंपनी सोहम इंक आणि कोस्टास इंकमध्ये 156 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 8 कोटी रुपयांची रक्कम लाच देण्यासाठी राखीव होती. हा सगळा हिशेब तब्बल 4500 कोटींच्या घरात जातो. परंतु सध्याच्या बाजारातील दरानुसार आसारामचा एकूण गोरखधंदा 10 हजार कोटींहून अधिकच आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर  पाहा, पीडितेने सांगितलेली 'त्या' रात्रीची आपबीती...
बातम्या आणखी आहेत...