Home »National »Other State» After Ten Days In Jail This Is The Schedule Of Gurmeet Ram Rahim

तुरुंगातही बलात्कारी बाबाची ऐट; चपाती खात नाही, ज्यूस कितीही द्या! पाहा पूर्ण वेळापत्रक

दिव्य मराठी वेब टीम | Sep 07, 2017, 16:35 PM IST

रोहतक - साध्वी बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची कैद भोगत असलेला बाबा गुरमित राम रहीमला जेलमध्ये 10 दिवस होऊन गेले आहेत. 25 ऑगस्टला त्याला दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून तो सुनारियां जेलमध्ये कैदेत आहे. गुरमित राम रहीम आतापर्यंत कुटुंबीयांना भेटू शकलेला नाही. त्याने 10 लोकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु पोलिस व्हेरिफिकेशनमुळे आतापर्यंत कोणालाही भेटता आलेले नाही.
जेल कँटीनमधून फ्रूट आणि ज्यूस घेतोय गुरमित राम रहीम...
- गुरमित राम रहीम ज्या दिवशी सुनारिया जेलमध्ये गेला, त्या दिवशी जेलच्या अकाउंटमध्ये 18 हजार रुपये टाकण्यात आले होते. गुरमित त्याच पैशांनी जेलच्या कँटीनमधून फ्रूट आणि ज्यूस घेत आहे.
जेलची चपाती आवडत नाही...
- गुरमितला जेलच्या चपात्या पसंत पडत नाहीयेत. अनेकदा सांगूनही तो खूप कमी पोळ्या खात आहे. त्याच्यासाठी जेल प्रशासनाने दोन नंबरदार तैनात केलेले आहेत.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जेलमध्ये बाबाचे शेड्युल...

Next Article

Recommended