Home »National »Other State» After Twelve Days In Jail This Is The Schedule Of Gurmeet Ram Rahim

तुरुंगात 'या' बेडवर झोपतोय बलात्कारी बाबा, काहीच येत नसल्याने घेतले जातेय हे काम

दिव्य मराठी वेब टीम | Sep 08, 2017, 12:52 PM IST

  • कधीकाळी 10 लाखांच्या आलिशान बेडवर झोपणाऱ्या बाबाला सिमेंटच्या बेडवर झोपावे लागतेय.
रोहतक - एका दिवसात 16 लाख कमावणारा आणि राजसी थाटबाटात राहणारा डेराप्रमुख राम रहीम आता जेलमध्ये फक्त 40 रुपये दररोज कमावतोय. बाबाला तुरुंगात जाऊन 12 दिवस होऊन गेले आहेत. तथापि, तुरुंगात प्रत्येक कैद्याला त्याच्या कौशल्यानुसार काम दिले जाते. आणि त्याप्रमाणे मेहनताना दिला जातो. बाबाकडूनही काम करण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आला की त्याला नेमके येते तरी काय!
दिवसभर काम करून 40 रु. कमावतोय बाबा...
- मीडिया रिपोर्टनुसार, बाबाला जेल प्रशासनाने माळीकाम दिले आहे. सोबतच त्याला सुतारकामासाठी उभे केले जातेय.
- खरे तर राम रहीमकडे कोणतेही कौशल्य नाही म्हणूनच त्याच्याकडून असे काम करून घेतले जात आहे.
- इतर कैद्यांप्रमाणेच त्याला वेळेवर उठावे लागते आणि कामाला लागावे लागते.
- सूत्रांनुसार, तुरुंगाच्या 8 बाय 8 च्या सेलमध्ये राम रहीम भिंतींशी बोलत राहतो.
- जेल प्रशासनाने बाबाला सिमेंटचा बेड दिला आहे, त्यावरच तो झोपत असतो.
- बाबा रात्री जेलमध्येच चकरा मारतो, कुणाशीच बोलत नाही, मग त्याच्या सिमेंटच्या बेडवर झोपेविना तळमळत राहतो.
पूर्वी दिवसाकाठी कमवायचा 16 लाख
- मीडिया रिपोर्टनुसार, तुरुंगात जाण्याआधी बाबा भारताच्या अशा व्हीआयपी लोकांपैकी ज्यांना Z सिक्युरिटी देण्यात आली होती.
- 2015 मध्ये एका वर्तमानपत्राने बाबाला भारताच्या 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत सामील केले होते.
- बाबाचे जगभरात 5 कोटी शिष्य आहेत. ज्यांचा वापर बाबाने व्होट बँक तसेच मोठ्या मार्केटसारखा केला.
- माहितीनुसार, तुरुंगात जाण्याआधी बाबाची दररोजची कमाई 16 लाख रुपये होती. 2015-16 मध्ये गुरमितचा व्यवसाय 776.39 कोटी रुपये राहिला.
बाबामुळे परेशान झाले 1500 कैदी
- राम रहीमला तुरुंगात जाऊन 12 दिवस झाले आहेत. या 12 दिवसांत रोहतकच्या जेलमधील इतर कैदी बाबामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत.
- जेलमध्ये बंद कैद्यांना तुरुंगात असूनही भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण राम रहीममुळे त्यांना सकाळ-संध्याकाळ फिरायलाच मिळत नाहीये.
- बलात्कारी बाबामुळे जेलची सिक्युरिटी एवढी कडक केली आहे की, कैद्यांना भेटायला येणारेही त्यांना नीट भेटू शकत नाहीत.
- आधी किमान फोनवर तरी कैद्यांना घरच्यांशी बोलता येत होते, परंतु आता त्यावरही निर्बंध आले आहेत. कैद्यांनीच हा दावा केला की, जेलमध्ये बंद असलेले इतर कैदी राम रहीमला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याची मागणी करत आहेत.
पुढच्या स्लाइड्वर पाहा, राम रहीमचे रॉयल अंदाजातील निवडक फोटोज...

Next Article

Recommended