आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी सेक्स रॅकेट तर कोणी चालवायचे अबॉर्शन सेंटर, 14 भोंदूबाबांचे हे कारनामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नवी दिल्ली -  अखिल भारतीय आखाडा परिषदेने भोंदूबाबांची नावे जारी केली आहेत. या यादीत गुरमित राम रहीमपासून ते आसाराम, राधे माँ यांचेही नावे आहेत. परिषदेने बैठक घेऊन इतर अनेक बाबांच्या नावावर निर्णय घेतला आहे. आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले की, 'ही अशा लोकांची यादी आहे जे धर्माच्‍या नावावर जनतेला फसवत आहे. अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे आणि त्‍यांची संपत्‍ती जप्‍त केली पाहिजे.
 
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, या यादीत कोणकोणते बाबा-बुवा आहेत...
 
यापुढे एका प्रक्रियेने दिली जार्इल संत पदवी
- अखिल भारतीय आखाडा परिषदेने म्‍हटले आहे की, कोणालाही संत उपाधी प्रदान करण्‍यासाठी आम्‍ही एक प्रक्रिया तयार करत आहोत. 
- डेरा सच्‍चा सौद्याचा प्रमुख राम रहिम याला 20 वर्षांची शिक्षा झाल्‍यानंतर हिंदु धर्मगुरुंनी हा निर्णय घेतला आहे. 
- विश्‍व हिंदु परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले आहे की, देशातील संतांमध्‍ये फार पूर्वीपासून याबाबत विचार सुरु होता. कारण एक किंवा दोन भोंदुबाबांच्‍या दुष्‍कृत्‍यांचा परिणाम सर्व संतांना भोगावा लागत आहे. 
- आखाडा परिषदेने म्‍हटले आहे, संत उपाधीचा चुकीचा वापर होत आहे. त्‍यामुळे या उपाधीचा गैरवापर टाळण्‍यासाठी एका प्रक्रियाद्वारे ही उपाधी प्रदान केली जाईल.
 
नरेंद्र गिरी यांना मिळाली जीवे मारण्‍याची धमकी
- आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष नरेंद्र गिरी यांनी जीवे मारण्‍याची धमकी मिळाली आहे. आखाडा परिषदेच्‍या एक दिवस बैठकीआधी शनिवारी फोनवरुन ही धमकी देण्‍यात आली, असे नरेंद्र गिरी यांनी सांगितले आहे . 
- मागील 3 दिवसांपासून आपल्‍याला धमक्‍या मिळत आहेत. फोन करणा-याने आपण आसारामचा शिष्‍य असल्‍याचे सांगितले, अशी माहिती नरेंद्र गिरी यांनी दिली आहे.
 
जाणून घ्या, या यादीत कोणकोणते बाबा-बुवा आहेत...
बातम्या आणखी आहेत...