आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलर्ट! फक्त 55 रुपयांच्या केमिकलने पिकवतात फळे, तुम्ही तर खात नाहीयेत ना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेस्टिव्हल सीझनमध्ये मिठाईसोबतच फळांचीही डिमांड वाढते. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत अनेक सणांमध्ये बहुतांश करून फळांचा वापर होतो. या दिवसांत व्रतवैकल्ये करणारे महिला-पुरुष उपवासामुळे फळांवरच अवलंबून असतात. परंतु बाजारात केमिकल कार्बाइड वापरून फक्त काही तासांतच कच्चे केळे पिकवून बाजारात आणले जात आहेत.
 
भाजी मंडईतच कार्बाइडने पिकवले जाताहेत...
- एका व्यापाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कार्बाइडमुळे एका दिवसातच केळे पिकवले जाते.
- यामुळे नुकसान आहे, परंतु आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही. दुसरीकडे डॉ. राकेश गोयल म्हणाले की, हे केमिकल खूप घातक आहे. व्यापाऱ्यांकडे दुसरा पर्याय नसल्याचे म्हणतात पण हे सरळसरळ गंभीर आजारांना निमंत्रणच ठरत आहे.
 -मार्केटमध्ये येणारी पपई, केळी, टरबूज व अशी अनेक फळे कार्बाइड पिकवली जाताहेत.
 
या दिवसांत केमिकलचा वापर वाढतो
- पिवळे आणि सुंदर दिसणारी केळी लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करते, परंतु हीच केळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
- फळांना कार्बाइडने पिकवल्याने त्यांतील व्हिटॅमिनव पोषक तत्त्व खूप कमी होतात.
- खासकरून सणासुदीच्या दिवसांत फळांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी सर्रास कार्बाइडचा वापर करत असल्याने या दिवसांत केमिकलचा वापर वाढतो.
- बाजारातून ठिपकेदार सालटे असलेली केळी गायब होत आहे. आता सर्व जागी पिवळी केळीच दिसू लागली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कशा प्रकारे केमिकलने एवढ्या लवकर केळी पिकते?
बातम्या आणखी आहेत...