आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीची आई आहे वर्ल्ड फेमस मॉडेल, मित्रही म्हणतात- Your Mom Is Hot

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी अस्का 22 वर्षांची, तर तिची मॉडेल आई 42 वर्षांची आहे. - Divya Marathi
मुलगी अस्का 22 वर्षांची, तर तिची मॉडेल आई 42 वर्षांची आहे.
आग्रा - एलिट मिसेस इंडिया 2016 रश्मी सचदेवा पीएम नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेशी जोडलेल्या आहेत. यूपीशी नाते असणाऱ्या रश्मी यांनी 19व्या वर्षी लग्न केले होते. त्यांनी पहिल्यांदा ब्यूटी पेजेंटमध्ये त्यांच्या 20वर्षीय मुलीच्या म्हणण्यावरून सहभाग घेतला होता. DivyaMarathi.Com सह रश्मी यांनी आपल्या जीवनाशी निगडित काही बाबी शेअर केल्या.
 
फिटनेस पाहून मुलीचे मित्रही म्हणतात 'HOT'
- 41व्या वर्षाच्या वयात रश्मी यांनी आपले फिटनेस मेंटेन ठेवले आहे. त्यांची मुलगी आस्का हिच्या फेसबुक पेजवर तिचे मित्र रश्मी यांना हॉट आणि ब्युटिफूल अशा कॉम्प्लिमेंट्स देतात. एक मित्राने FB वर लिहिले आहे, "Wow, aunty is hot, थोड्या जास्तच!"
- फिटनेसबद्दल रश्मी म्हणतात, मी क्रॅश डाएटिंगमध्ये विश्वास ठेवत नाही, तसेच जिमबद्दलही. मी जिमपेक्षा जास्त मॉर्निंग वॉकवर फोकस करते. दररोज 40 मिनिटे वॉक करते."
- प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. तेव्हा मी अर्ली ट्वेंटीजमध्ये होते. मी वॉकच्या माध्यमातून 12 किलो वजन कमी केले होते. हेच आजही माझे फिटनेस सीक्रेट आहे.

ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये झाले लग्न
- रश्मी यांचे 1994 मध्ये दिल्लीच्या चार्टर्ड अकाउंटंट मनोज सचदेवा यांच्याशी लग्न झाले होते. तेव्हा त्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये होत्या. फक्त एका वर्षानंतर 13 सप्टेंबर 1995 मध्ये त्यांची मुलगी आस्काचा जन्म झाला.
- रश्मी सांगतात, मला लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवायचे होते. यात माझ्या पतींनीही मला पाठिंबा दिला. मी मुलीला सांभाळतच अगोदर ग्रॅज्युएशन कम्प्लिट केले. त्यानंतर इंटिरिअर डिझायनिंगमध्ये डिप्लोमाही केला.
 
स्वप्न राहिले होते अधुरे, मुलीच्या हट्टाने सत्यात उतरले
- रश्मी म्हणाल्या, मला लहानपणापासूनच फोटो काढण्याचा छंद होता. मी मॉडेल बनावे असे मला वाटायचे. कमी वयात लग्न झाले, मग मुलगी, मग हे स्वप्न जवळपास संपल्यातच जमा होते. मी आवडीमुळे मॅगझिन्समध्ये फोटो पाठवायचे. ते प्रकाशकांना आवडले आणि त्यांनी नियमित प्रसिद्ध करायला सुरुवात केली.
- 2015 मध्ये दिल्लीत एक मिसेस ब्युटी पेजेंट होते, यात माझ्या मैत्रिणी भाग घेत होत्या. हे पाहून माझी मुलगी म्हणाली- मम्मी तूही ट्राय कर. अगोदर मी नकार दिला, पण ती हट्टच धरून बसली. तेव्हा मी भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि किताब पटकावला. माझा आत्मविश्वास यामुळे वाढला. मग 2016 मध्ये मी मिसेस इंडिया आणि मिसेस एशिया इंटरनॅशनलचे किताबही जिंकले. येथूनच मी चीनच्या ग्वांग्झूमध्ये झालेल्या मिसेस युनिव्हर्ससाठी गेले होते. तेथे मला मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्टचे टायटल मिळाले.
 
मुलीला आली होती 'सुपर मॉडेल'ची ऑफर
- रश्मी सांगतात, लोक मला विचारतात की, तुमची मुलगीही मॉडेल बनेल का? पण हा निर्णय मी तिच्यावरच सोडला आहे. नुकतीच माझ्या मुलीला "सुपर मॉडेल ऑफ द वर्ल्ड"ची ऑफर आली होती, पण तिने ती रिजेक्ट केली. ती सध्या ग्रॅज्युएशन करत आहे आणि करिअर निवडण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या सुंदर आई-मुलीच्या जोडीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...