आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 लाखांच्या बेडवर झोपायचा बलात्कारी बाबा, विदेशातून यायची \'लाल-गुलाबी\' चादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबाचा 10 लाखांचा आलिशान बेड. - Divya Marathi
बाबाचा 10 लाखांचा आलिशान बेड.
रोहतक - साध्वी बलात्कार प्रकरणात रोहतकच्या तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला बलात्कारी राम रहीमचे एकेक नवनवे किस्से समोर येत आहेत. बाबाने सिरसामध्ये एक आलिशान रिसॉर्ट बनवला होता. ज्यात हरतऱ्हेच्या कुकृत्यांसाठी खास सुविधा करून ठेवलेल्या होत्या. वास्तविक, धार्मिक कार्यासाठी या रिसॉर्टची निर्मिती करण्यात आली होती. पण हळूहळू त्याने पाप करण्यासाठी ही जागा वापरायला सुरुवात केली. या रिसॉर्टमध्ये बाबाची 40X40 ची खोली होती, ज्यात हा बलात्कारी बाबा 10 लाख रुपये किमतीच्या बेडवर झोपायचा.
 
बाबाच्या रिसॉर्टमध्ये यायचे VIP, एक दिवस राहण्यासाठी द्यायचे लाखोंचा किराया
- बाबाने आपल्या सुखसुविधांसाठी सिरसामध्ये 91 एकरमध्ये 16 आलिशान व्हिला बनवलेले आहेत. यात तो त्याचे शौक पूर्ण करायचा.
- या रिसॉर्टमध्ये एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सर्व सुविधा होत्या. आलिशान मोठमोठ्या खोल्यांमध्ये लाखोंचे फर्निचर ठेवलेले होते.
- यात स्विमिंग पूल आणि जकूजी स्पा यासारख्या लक्झरी सुविधाही आहेत.
 
राम रहीमच्या बेडवर यायचे स्पेशल चादर
- राम रहीम ज्या खोलीत झोपायचा, त्यात होम थिएटरपासून ते स्विमिंग पूल बनवलेले होते.
- मीडियानुसार बाबा ज्या बेडवर झोपायचा, त्याची किंमत 10 लाखांहून जास्त होती. तो विदेशातून मागवण्यात आला होता.
- बाबा जेव्हा मुक्कामी असायचा तेव्हा या बेडवर लाल-गुलाबी चादर अंथरली जायची.
- राम रहीमच्या बेडसाठी स्पेशल चादर, तक्के, लोड विदेशातून यायचे.
 
ताजमहालासारखा होता बाबाचा आलिशान व्हिला
- या रिसॉर्टमध्ये बाबाने छंदीफंदीपणासाठी 58 खोल्या बनवल्या होत्या, सोबतच यात 16 मोठे व्हिलाही बनवलेले होते.
- राम रहीम या खोल्यांना किरायानेही द्यायचा, ज्याची किंमत लाखोंमध्ये होती.
- बाबाने या रिसॉर्टमध्ये ताजमहालसारखा एक आलिशान व्हिला बनवला होता.
- या ताजमहाल व्हिलाची सर्वात जास्त सिक्युरिटी होती.
- राम रहीम येथे नेहमी मालिश करण्यासाठी आणि स्टीम बाथ घेण्यासाठी यायचा.
- या व्हिलात लाखो रुपये किमतीचे लाइट आणि महागड्या खुर्च्या होत्या, ज्यावर हा बलात्कारी बाबा आराम करायचा.
- बाबा येथे आला की इतर सर्वांना बाहेर काढले जायचे. फक्त बाबाच येथे ऐश करण्यासाठी थांबायचा.
- एवढेच नाही, बाबा आल्यावर सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जात होते.
 
VIP लोकंही यायचे
- येथे राजकीय नेते, इतर व्हीव्हीआयपी लोकांना थांबण्याचीही सोय करून ठेवलेली होती.
- बाबाचा हा रिसॉर्ट फक्त अय्याशीसाठी तर होताच, सोबतच यापासून तो कमाईही करत होता.
- या रिसॉर्टमध्ये 5 कॅटेगरीत खोल्या मिळायच्या. प्रीमियम रूमपासून ते लक्झरी रूमपर्यंत वेगवेगळे दर होते.
- येथे एका रात्रीसाठी जे व्हीआयपी यायचे, ते लाखो रुपयांचे भाडे देऊन जायचे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या लक्झरी रिसॉर्टचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...