आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेल मासा दाखवतो म्हणून बोलवायचा टीचर, मग मुलींशी करायचा असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर (बिहार) - येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक शाळेतील मुलींना व्हेल मासा दाखवतो म्हणून जवळ बोलवायचा आणि मग त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. मुलींनी याची माहिती घरच्यांना दिली तेव्हा सर्व पालक शाळेत पोहोचले. मग अभूतपूर्व गोंधळ झाल्यावर शिक्षकाने सर्वांची हात जोडून माफी मागितली. यानंतर त्याला पालकांनी सोडून दिले.
 
असे आहे प्रकरण...
- हे प्रकरण येथील प्राथमिक शाळेतील आहे. येथे 6 ते 10 वर्षीय मुलींची छेडछाड काढल्याने गावकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला.
- शिक्षक निरंजन कुमारने दुपारी लंचदरम्यान शाळेतील मुलींची छेड काढली. त्यांना मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवले.
- काही मुलींनी हे व्हिडिओ पाहण्यास नकार दिला आणि घरी जाऊन शिक्षकाचा कारनामा सांगितला. संतापलेल्या गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळा गाठली.
- प्रकरण तापल्याचे पाहून आरोपी शिक्षकाने सर्वांच्या हातापाया पडून माफी मागितली. 
- पोलिसांतही तक्रार करण्याविषयी सांगितले. यानंतर शाळेतच गावाची पंचायत भरली. संतापलेल्या लोकांनी शिक्षक निरंजन कुमार येथून तोंड काळे करून निघून जा, असे सुनावले.
- तो गेल्यानंतर शाळेतील हेडमास्तर आणि इतर शिक्षकांनी हे प्रकरण येथेच मिटवा म्हणून गावकऱ्यांना गळ घातली.
- मग गावकऱ्यांनीही बदनामी टाळण्यासाठी पोलिसांत तक्रार दिली नाही.
- गावकऱ्यांनी शिक्षकाला इशारा दिला की, पुन्हा जर असे प्रकार झाले तर तुरुंगात टाकू.
- पहिल्यांदाच अशी तक्रार आली म्हणून सोडत आहोत.
 
हेडमास्तर म्हणाले,
- हेडमास्तर अनिलकुमार दास म्हणाले की, आरोपी शिक्षकाने माफी मागितली आहे. गावकऱ्यांनीही त्याला माफ केले आहे. आम्ही आमच्या शिक्षण विभागाला त्याच्याविरुद्ध कारवाईचे पत्र पाठवले आहे.
- तर शिक्षण विभागाचे डीईओ चंद्रमोहन मिश्र म्हणाले, या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. याचा तपास केला जाईल. लिखित तक्रार मिळताच आरोपी शिक्षकावर कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफमध्ये पाहा, मुलींनी घरच्यांना काय सांगितले...
बातम्या आणखी आहेत...