आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीची \'मजबुरी\' आईने डोकावल्यावर कळली; दररोज सहन करत राहिली बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमुई - रात्री उशिरा मुलीच्या रूममध्ये गावातील तरुणाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून आईवडिलांना हे प्रेमप्रकरण असल्याचे वाटले. परंतु, सत्य काही वेगळेच होते. एका व्हिडिओच्या भीतीमुळे तरुणी त्याची प्रत्येक गोष्ट मानण्यासाठी मजबूर झाली होती. तरुणाने काही दिवसांपूर्वी तिच्यावर रेप केला आणि त्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तरुणीला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण करत राहिला.
 
व्हिडिओच्या जिवावर तरुणीला ब्लॅकमेल करत होता तरुण...
- नीचपणाचा कळस गाठणारी ही घटना बिहारच्या जमुईतील आहे. साहपूर गावात महेश साव यांचा मुलगा राकेश कुमार पीडित तरुणीवर वाईट नजर ठेवायचा.
- व्हिडिओ बनवल्यानंतर दररोज तो तिचा आपल्या मर्जीनुसार वापर करायचा. पण रविवारी मात्र त्याचे बिंग फुटले.
- मुलीला न्याय देण्यासाठी आईवडिलांनी पंचायत बोलावली. त्यांना अपेक्षा होती की पंच मुलीच्या इज्जतीशी खेळणाऱ्या राकेशला शिक्षा देतील, पण असे काहीच झाले नाही.
- मंगळवारी झालेल्या पंचायतीत पंचांनी उलट मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिच्या वडिलांनाच 31 हजारांचा दंड ठोठावला.
 
मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली धमकी
- पंचायतीच्या या तुघलकी फर्मानानंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय गावातील काही व्यक्तींसह पोलिसांत गेले.
- पोलिसांनी पीडितेकडून माहिती तर घेतली, पण बुधवार सकाळपर्यंत एफआयआर दाखल केला नाही.
- प्रकरण पोलिसांत गेल्याचे कळताच पीडित तरुणीच्या कुटुंबाला आरोपीच्या घरच्यांकडून धमक्या यायला सुरुवात झाली.
- याप्रकरणी जमुईचे एस.पी. जयंत कान्त म्हणाले की, पीडित कुटुंबाकडून पोलिसांत प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत. तरुणीचे मेडिकल चेकअप करण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, न्यायाच्या जागी पंचांनी दिली शिक्षा...
बातम्या आणखी आहेत...