आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boy With His Friend Dushkarm On Young Girl Indore MP Latest Crime News And Updates

ज्या तरुणीशी होणार होते लग्न, तरुणाने मित्रासह मिळून केला गँगरेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - राऊ पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीच्या बलात्कारप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचे एका युवकाशी लग्नाची बोलणी सुरू होती. यादरम्यान तरुण आणि तरुणीत बोलणेचालणे वाढले होते, याचा फायदा घेऊन आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने स्वत:च्या मित्रालाही तरुणीच्या घरी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

घरात एकटीच होती तरुणी, तेवढ्यात मित्रासह पोहोचला तरुण...
- तरुणीने जेव्हा आईला आरोपी तरुणाच्या या कृत्याबद्दल सांगितले तेव्हा आईने तिच्यासह थेट पोलिस स्टेशन गाठून सर्व घटना सांगितली.
- प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेचच घेराबंदी करत आरोपींना शोधून अटक केली.
- पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी कलेक्टर ऑफिसमध्ये दलालीचे काम करतात. 

सीएसपी पारुल बेलापूरकर म्हणाल्या, ही घटना राऊ परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून राहुल नरेंद्र मंडलोई (28) आणि गोलू तोलंबिया (30 ) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून पाहा, संपूर्ण घटनाक्रम

बातम्या आणखी आहेत...