सिरोही - माउंट अबूच्या हॉटेलमध्ये एका विवाहितेला बांधून सतत 10 दिवस बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कशीबशी सुटका करून महिलेने पोलिसांत पोहोचून तक्रार नोंदवली. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. 10 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीनेही ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
असे आहे प्रकरण...
- पोलिस सूत्रांनुसार, महिलेने सांगितले की, लग्नाआधी ती माउंट अबूमध्ये एका मार्बल व्यापाऱ्याकडे काम करत होती. यादरम्यान जवळच बांधकाम सुरू असलेल्या बांधकामाच्या ठेकेदाराच्या मुलाशी तिची ओळख झाली. दोघेही फोनवर बोलत होते, परंतु तिच्या घरच्यांना याची भनक लागली.
- काही दिवसांनीच तिचे लग्न लावण्यात आले. अहमदाबादेत सासरी राहायला आल्यानंतरही तिचा प्रियकर घनश्याम तिला फोन करून त्रास देत होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून तिने सिम कार्ड तोडले.
सिम तोडल्यावर प्रियकराने मिळवला सासूचा नंबर
- तरुणीचे फोन बंद झाले तेव्हा आरोपी प्रियकराने तिच्या सासूचा नंबर माहिती करून त्यावर फोन करू लागला. तो धमकी द्यायचा की, त्याच्याकडे तिच्या पतीचाही फोन नंबर आहे. जर ती त्याला भेटायला आली नाही, तर तिचे सर्व फोटो आणि व्हिडिओ तो नवऱ्याला देऊन टाकीन.
फक्त एकदा भेट
- घनश्यामने फोन करून तिला म्हटले की, फक्त एकदाच भेट. तुझ्यासमोरच मी सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो.
- तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पतीला माहेरी माउंट अबूला जात असल्याचे म्हणाली. नवऱ्यानेच तिला मग अहमदाबादहून माउंट अबूच्या बसमध्ये बसवून दिले.
- तिथे पोहोचताच आरोपीने तिला भूलथापा मारून हॉटेलमध्ये नेले. तेथे आरोपीने महिला आणि स्वत:चे फेक आयडी दाखवून रूम बुक केली आणि जेवणाची ऑर्डर दिली. दरम्यान, महिला बाथरूममध्ये गेली, तेवढ्यात आरोपीने तिच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळला. जेवणानंतर विवाहिता बेशुद्ध झाली. मग आरोपीने तिला बेडवर दोरखंडाने बांधून बलात्कार केला.
10 दिवस ठेवले रूममध्ये बांधून
- महिलेने पोलिस रिपोर्टमध्ये सांगितले की, घनश्यामने 10 दिवस तिला हॉटेलच्या खोलीत कुणालाही येऊ दिले नाही. तो स्वत:च बाहेरून जेवण घेऊन यायचा. तिला बेडवर दोरीने बांधून ठेवलेले होते. तोंडही फक्त जेऊ घालण्यासाठी उघडायचा. नंतर पुन्हा टेप लावून घ्यायचा. बाथरूमलाही स्वत:च न्यायचा आणि पुन्हा दोरीने बांधून ठेवायचा. या जाचातून पीडितेने एका दिवशी स्वत:ची कशीबशी सुटका केली आणि पोलिसांत पोहोचून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो व पीडितेची इन्फोग्राफिक आपबीती...