आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रद्युम्न हत्याकांड: कंडक्टर अशोकला 73 दिवसांनी मिळाला जामीन, पोलिसांनी बनवले होते आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम (गुडगाव) -

गुरगाव- हरियाणाच्या गुरगावमध्ये रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न हत्येप्रकरणी अटकेतील बस वाहक अशोक कुमार यास न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. त्याच्या जामीन अर्जावर १६ नोव्हेंबरला मागील सुनावणी झाली होती.


सुनावणीदरम्यान सीबीआय व प्रद्युम्नच्या वकिलांनी अशोकला जामीन देण्यास विरोध दर्शवला होता. अशोकच्या विरोधात काहीही पुरावा मिळाला नसल्याचे सीबीआयने म्हटले होते. हत्येच्या दिवशीच गुरगाव पोलिसांनी अशोकला अटक केली होती. मात्र, तपासानंतर सीबीआयने रेयान स्कूलच्या ११ वीतील मुलास हत्येचा आरोपी असल्याचा दावा केला होता. 


40 मिनिटे चालली सुनावणी.. 
- सोमवारी प्रकरणाची सुनावणी दुपारी 12 वाजता जिल्हा सत्र न्यालयात सुरू झाली. सीबीआयचे 5 अधिकारी वकीलाबरोबर वरुण ठाकूर (प्रद्युम्नचे वडील) आणि त्यांचे वडील सुशील टेकरीवाल आणि अशोक यांचे वकील मोहित वर्मा कोर्टात उपस्थित होते. कोर्टातील वाद-प्रतिवादादरम्यान सीबीआयने सरकारकडून सादर करण्यात आलेले प्रतित्रापत्र सादर केले. 
- सुमारे 40 मिनिटे सुनावणी चालली. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित डॉक्युमेंटही कोर्टात सादर केले. सीबीआयने म्हटले की, त्यांचा ज्युडिशियल एरिया पंचकुलामध्ये आहे. तर सीबीआयचे स्पेशल कोप्ट आहे, त्यामुळे सुनावणी तेथेच व्हायला हवी. 


सीबीआयने केला होता जामीनाला विरोध 
- कोर्टात सीबीआयच्या वकिलांनी म्हटले की, तपास अजूनही सुरू आहे. कंडक्टर अशोकला क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सर्व फॅक्ट्सवर आमची नजर आहे. केसमध्ये जोपर्यंत सीबीआय चार्जशीट दाखल करत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लीनचीट देता येणार नाही. 
- सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, सीबीआयने विद्यार्थ्याला आरोपी ठरवले असले तरी त्या मुद्द्यावर अशोकला सोडता येणार नाही. 


काय आहे प्रकरण... 
- गुरुग्राम (गुडगाव) रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला 7 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोकने 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कंडक्टरची नोकरी सुरू केली होती. 
- अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो आणि त्याठिकाणी वाईट कृत्य करत होता. त्याचवेळी त्याठिकाणी तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी आधी त्याला धक्का दिला नंतर त्याल ओढले. तो ओरडायला लागला तेव्हा मी घाबरलो. त्यानंतर त्याला दोनवेळा चाकू मारला आणि त्याचा गळा कापला. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, सीबीआयने आरोपीला विद्यार्थ्याला ज्या थेअरीवर अटक केली त्या थेअरीबाबत समोर आलेल्या शंका.. कारण याच थेअरीनंतर अशोकच्या जामीन प्रक्रियेचा वेग वाढला...

बातम्या आणखी आहेत...