आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेल बनण्यासाठी तरुणीला कर्नलने बोलावले घरी, दार बंद करून केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- आर्मी सेना कमांड सिमल्यामध्ये तैनात कर्नल ग्रेवाल यांना पोलिसांनी तरुणीच्या गँगरेपच्या तक्रारीवरून अटक केली आहे. पीडितेने जबाबात म्हटले होते की, मॉडेलिंगचे काम मिळवून देतो म्हणून घरी बोलावले. तेथे बळजबरी दारू पाजली. मग तिथे आधीपासूनच असलेल्या मित्रासह मिळून रेप केला.

 

वडिलांसह पार्टीत भेटली होती कर्नलला...
- पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 376 डी अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
- कर्नलने तरुणीवर त्याच्या लक्कडबाजारातील घरात रेप केला.
- पोलिसांतील एफआयआरनुसार तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, 19 नोव्हेंबर रोजी कर्नल ग्रेवालने पीडितेच्या वडिलांना क्लबमधील एका इव्हेंटला बोलावले होते. या इव्हेंटमध्ये पीडिता वडिलांसह गेली होती.
- पार्टी संपल्यानंतर सर्वांनी सोबतच डिनर केले. ग्रेवालने याच वेळी सांगितले की, माझीही मुलगी मुंबईत आहे आणि तू मॉडेलिंगसाठी तिच्याकडे मुंबईला जायला पाहिजे. यानंतर कर्नल ग्रेवालने तिचा मोबाइल नंबरही घेतला. कर्नलने म्हटल्यानुसार, पीडितेने तिचे काही फोटोज व्हॉट्सअॅपवर पाठवले होते.

 

शुद्धीत येताच पळून जाऊ लागली तेव्हा वडिलांची नोकरी जाण्याची दिली धमकी...
- पीडितेने आरोप केला की, बलात्कारानंतर ती बेशुद्ध झाली. संध्याकाळी साडेपाच वाजता शुद्धीत आल्यावर ती अनवाणी पायांनी पळू लागली. तेवढ्यात ग्रेवाल माझ्या मागे बॅग आणि चपला घेऊन आला.
- तो म्हणाला की, आर्मी ऑफिसर माझा नातेवाईक आहे, तुझ्या वडिलांची नोकरी जाऊ शकते.
- पीडितेने आरोप केलाय की, ग्रेवालने मला मॉडेलिंगसाठी मदत करतो म्हणून घरी बोलावले आणि नशेच्या अवस्थेत बलात्कार केला. यानंतर पीडितेने घरी येऊन सर्व हकिगत सांगितली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पूर्ण घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...