आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीची वेळ आल्यावर मुलायम पळ काढतात! काँग्रेसचा सपा नेत्यावर पलटवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यांच्या कथनी व करणीत खूप अंतर आहे. जातीयवादी शक्तीच्या विरोधात आघाडी बनवण्याची वेळ आल्यावर ते पळ काढतात, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ‘काँग्रेसने आम्हाला बरबाद केले,’ या मुलायम यांच्या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसने त्यांच्यावर असा पलटवार केला.  

समाजवादी पार्टीच्या सध्याच्या पतनाला काँग्रेस जबाबदार आहे, असा मुलायम यांचा आरोप बिनबुडाचा आहे. बिहारमध्ये समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी कोणी मोडली? अर्थातच मुलायमसिंह यादव यांनीच हे काम केले. त्यावरून बोलायचे एक आणि प्रत्यक्षात वेळ आल्यावर शब्दाला जागायचे नाही हे काम मुलायम यांनी केले आहे. ते नेहमी आघाडी करायची वेळ आली की पळून जातात, असे काँग्रेसचे प्रवक्ते अशोकसिंह यांनी सांगितले. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

वास्तविक निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीत अंतर्गत संघर्ष पेटलेला होता. पराभवाला काँग्रेस जबाबदार नाही याकडेदेखील अशोकसिंह यांनी लक्ष वेधले.  

त्यांची मन:स्थिती समजू शकते...
भाजप- मुलायम यांनी काँग्रेससोबत युती केल्यावरून अखिलेश यादव यांची जाहीरपणे खरडपट्टी काढली आहे. त्यावरून पोटच्या मुलाबद्दल वडिलांची मन:स्थिती काय झाली आहे हे समजू शकते. म्हणूनच त्यांचे वक्तव्य चकित करणारे मुळीच नाहीत,  असे भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे, असे विधान मुलायम यांनी केले होते. त्याचा भाजपने समाचार घेतला आहे. 
बातम्या आणखी आहेत...