आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडातला प्रसाद भक्तांच्या हातावर थुंकते राधे माँ, भक्तही याला मानतात शुभ !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त राधे माँ. - Divya Marathi
वादग्रस्त राधे माँ.
जालंधर - स्वत:ला देवीचा अवतार सांगणारी वादग्रस्त राधे माँवर एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसंबंधी कोर्टाच्या अवमानना याचिकेवर पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाने कपूरथळाच्या एसएसपींना नोटीस जारी करून उत्तर मागवले आहे. या पार्श्वभूमीवर राधे माँबाबतची ही विशेष माहिती, ती आपल्या भक्तांना असा विचित्र प्रसाद देते.
 
भक्तानेच सांगितले, असा प्रसाद देते राधे माँ...
- राधे माँची प्रसाद देण्याची पद्धत इतर सर्व धर्मगुरूंपेक्षा खूप वेगळी आहे.
- भक्तांनुसार, ती एखाद्याला प्रसादरूपात काहीही देऊ शकते. यात कपडे, त्रिशूल, रोख रक्कम तसेच इतर वस्तूही असू शकतात.
- भक्त सांगतात, ती आपल्या तोंडात पेढा ठेवून भक्ताच्या पुढे केलेल्या हातावर थुंकते. हा थुंकलेला प्रसाद तिच्या भक्तांसाठी खूप फळ देणारा असतो. भक्तही मनोभावे तो ग्रहण करतात.
- पुढे सांगण्यात आले की, या प्रसादासाठी लोक रांगेत थांबून कित्येक तास वाट पाहतात.
 
यामुळे भक्तांच्या कडेवर बसते राधे माँ
- भक्त मानतात की, राधे माँला कडेवर धेतल्याने त्यांचे नशीब उघडते. त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो.
- भक्तांचा दावा आहे की, राधे माँ जेव्हा डान्स करते, तेव्हा त्यांच्या रूपात एका बालिकेचा भाव असतो. यामुळेच भक्त त्यांना गुडियादेवी माँ म्हणून बोलावतात.
- त्या कडेवर चढून हे सांगण्याचा प्रयत्न करतात की भक्त ज्यांची पूजा करत आहेत त्या सदैव त्यांच्यासोबत आहेत.
- सूत्रांनुसार, पूर्णपणे स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या असे करतात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राधे मॉँचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...