आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पत्नीला म्हणायचा नाईट ड्युटी, दुसरीला दिवसा; मग 3 दिवसांत केले 3 खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - येथे धूमनगंज परिसरात राहणाऱ्या एका हलवायाने 27 दिवसांत 2 लग्ने केली. 10 महिन्यांनी हे उघड झाल्यावर त्याने दुसऱ्या बायकोला मिळवण्यासाठी पहिलीचा खून केला आणि मृतदेह घरापासून 5 किमी अंतरावर एका तलावात फेकून दिला. जेव्हा त्याला वाटले की, त्याची पोलखोल झाली आहे, तेव्हा तिसऱ्या दिवशी त्याने पहिल्या पत्नीच्या म्हाताऱ्या बापाला आणि तिच्या छोट्या बहिणीलाही संपवले. क्राइम ब्रँचचे तत्कालीन इन्स्पेक्टर अनिरुद्ध सिंह यांच्या तपासापुढे या खतरनाक आरोपीचा टिकाव लागला नाही. खुनाच्या तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.
divyamarathi.com आपल्या क्राइम सिरीजमध्ये या घटनेबद्दल माहिती देत आहे.
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये वाचा... पत्नी-मेहुणी-सासऱ्याला संपवण्याची कहाणी
 
लिव्ह-इनमध्ये राहिल्यावर केले होते लग्न...
- शहराच्या करेली परिसरातील बेनिगंजमधील रहिवासी माधव प्रसाद (65) फेरीवाला होता. त्याची पत्नी शांतीदेवीचा मृत्यू झाला होता. 3 मुली होत्या ज्यात सर्वात मोठी अर्चना, दुसरी सुलोचना आणि सर्वात छोटी वंदना होती.
- अर्चनाचे लग्न कौशांबीतील राजूशी झाले होते. पण तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि शेजारच्या गल्लीतील विश्वजितशी प्रेमविवाह केला होता.
- दुसऱ्या नंबरची मुलगी सुलोचना ही साहिल केसवानीसोबत खूप दिवस लिव्ह इनमध्ये राहिली.
- तिसरी मुलगी वंदनाचे लग्न कौशांबीच्या अजयकुमार सिंहशी झाले होते.
- मोठी मुलगी अर्चनाने प्रेमविवाहानंतर म्हाताऱ्या बापाबरोबर राहू लागली. इकडे सुलोचना आणि साहिलच्या संबंधांची सगळीकडे चर्चा सुरू झाल्याने वडिलांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. अगोदर साहिल तयार नव्हता, पण नंतर सुलोचनाच्या दबावात त्याने लग्नाला होकार दिला.
- 9 जानेवारी रोजी साहिलला पोलिसांनी अटक केली आणि मग त्याने आपल्या गुन्ह्याची कुकर्म कथा स्वत: पोलिसांना सांगितली.
 
केसचे करंट स्टेटस
- इन्स्पेक्टर अनिरुद्ध सिंह म्हणाले की, त्याच्यावर 2 केस 2 वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. साहिल आणि त्याचा भावजी योगेशवर सुलोचनाची हत्या करून मृतदेह लपवणे, पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल झाला होता. करेली पोलिसांत साहिलविरुद्ध माधव आणि अर्चनाची हत्या आणि पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल झाला. सध्या साहिल आणि योगेश दोघेही तुरुंगात आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, का केली पत्नी, मेहुणी आणि सासऱ्याची हत्या...
बातम्या आणखी आहेत...