आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 इंचांमुळे मोजावे लागले 5 लाख, भरलग्नात तरुणीची शरमेने खाली गेली मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत एका नववधूसोबत 2008 मध्ये अशी घटना घडली की तिला आपल्या लग्नात शरमेने मान खाली घालावी लागली होती. नवरीने आपल्या लग्नासाठी लहंगा खरेदी केला होता, पण तो ठीक नसल्याने तिने दुकानदाराला पुन्हा दुरुस्त करायला दिला. लग्नाच्या दिवशी पुन्हा तिने तो घातला, पण पहिल्यासारखाच व्यवस्थित नसल्याचे तिला दिसले. मग मात्र नवरीने याची तक्रार ग्राहक मंचात दिली, ज्यावरून दुकानदाराला लहंग्याची पूर्ण किंमत आणि कंझ्युमर वेल्फेअर फंडमध्ये 5 लाख रुपये जमा करण्याची शिक्षा देण्यात आली.
 
लग्नाच्या दिवशीच घालावा लागला तोच लहंगा...
- लहंगा लहान असल्याचे लक्षात येताच तरुणीने दुकानदाराकडे जाऊन त्याच्या निदर्शनास आणून दिले. त्याने तो लहंगा ठेवून घेतला आणि म्हणाला की, सध्या माझा स्टाफ कमी आहे, ते आले की लगेच दुरुस्त करून देतो.
- काही दिवसांनी हा लहंगा दुरुस्त होऊन नवरीकडे आला, पण पूर्वीप्रमाणेच होता.
- नवरीला या 2 इंच लहान लहंग्यातच सप्तपदी घालण्याशिवाय पर्याय नव्हता.
- छोटा लहंगा असल्याने तिला सर्वांसमोर शरम वाटू लागली. लग्न आटोपल्यावर तिने दुकानदाराला याचा जाब विचारला, तर त्याने काहीच उत्तर दिले नाही.
- मग मात्र तरुणीने त्याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि ग्राहक मंचात धाव घेतली.
-8 वर्षे लागली न्याय मिळायला, पण निकाल तिच्याच बाजून आला आहे. ग्राहक मंचाने आपला निर्णय दुकानदाराविरुद्ध सुनावला.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, काय होते पूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...