Home »National »Other State» Dera Sacha Sauda Sirsa Search Operation Third Day Live And Update

बलात्कारी बाबाच्या डेरामधील झाडाझडती संपली, उद्यापासून सुरू होईल इंटरनेट अन् रेल्वेसेवा

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 18:44 PM IST

  • बाबाच्या डेऱ्यांमध्ये 3 दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती.
सिरसा -राम रहीमच्या डेरा हेडक्वार्टरमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम आज पूर्ण झाली. सिरसा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोमवारपासून एसएमएस, इंटरनेट आणि रेल्वे सेवा बहाल झाली आहे. कर्फ्यू हटवण्यावर उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होऊ शकतो. तथापि, आज सकाळी यात थोडी सूट देण्यात आली. हरियाणा सरकारच्या डेप्युटी डायरेक्टर, पब्लिक रिलेशन सतीश मेहरा म्हणाले, मोहीम पूर्ण झाली आहे. आता कोर्ट कमिश्नर आपली रिपोर्ट पंजाब-हरियाणा हायकोर्टाला सुपूर्द करतील.
-शनिवारी झालेल्या शोधमोहिमेत राम रहीमच्या डेऱ्यामध्ये गुप्त भुयारी मार्ग आढळला होता. याचा मार्ग राम रहीमच्या खोलीपासून ते साध्वींच्या खोलीपर्यंत जायचा. साध्वींवर बलात्काराच्या आरोपात सीबीआयच्या विशेष कोर्टाने 28 ऑगस्टला राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. बलात्कारी बाबा सध्या तुरुंगात आहे.
>झाडाझडतीत काय सापडले?
1) बाबाच्या महालातून गुप्त मार्ग
- गुरमीत राम रहिमच्या गुहेत (बंगला) एक गुप्त मार्ग सापडला आहे. 12 एकर परिसरात राम रहिमचा बंगला आहे. तपास पथकाला या गुहेत एक गुप्त मार्ग सापडला असून तो साध्वींच्या निवासस्थानपर्यंत जातो. राम रहिम आपल्या बंगल्याला गुहा म्हणत होता.
- हरियाणाचे माहिती उपसंचालक सुभाष मेहरा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेला ते म्हणाले, 'डेरामध्ये बंगल्यातून साध्वींच्या निवासस्थानापर्यंत एक भूयारी मार्ग सापडला आहे. याशिवाय डेरामध्ये एक स्फोटकांची कंपनी सापडली आहे.'
2) स्फोटके तयार करण्याचा कारखाना
- सर्च टीमला डेरामध्ये एक स्फोटके तयार करण्याचा कारखाना सापडला आहे. विशेष म्हणजे पशु खाद्य तयार करण्याची फॅक्ट्री असल्याचे सांगून येथे स्फोटके तयार केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या कारखान्याची माहिती सिरसा पोलिसांना नव्हती.
- कारखान्याच्या मालकाविरोधात एक्सप्लोसिव्ह अॅक्ट अंतर्गत कलम 5 आणि 9बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथून 80 बॉक्स जप्त करण्यात आले आहे. यात फटाके आणि स्फोटके आहे.
3) एके-47 चे रिकामे बॉक्स
- धर्मिक कार्य आणि अध्यात्माचे काम चालणाऱ्या डेरामध्ये एक-47 चे रिकामे बॉक्स सापडले आहे. अशी शक्यता आहे की यातील साहित्य आधीच डेरातून बाहेर नेण्यात आले आहे. याशिवाय एक वॉकी-टॉकी जप्त करण्यात आले आहे.
- डेरामध्ये चार आरा मशिनही सापडल्या असून त्यापैकी दोन विना परवाना असल्याचे समोर येत आहे. आरा मशिने मोठ मोठी लाकडे कापली जातात.
- जिल्हा वन अधिकारी रामचंद्र जांगडा यांनी सांगितले की विना परवाना दोन्ही मशिन्स जप्त करण्यात आल्या आहे. शक्यता आहे की डेरामध्ये अवैध लाकडूतोडही सुरु होती.
4) डेराचा चार गावांशी संपर्क तुटला, लोक टीव्हीसमोर बसून
- सिरसामधील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सर्च ऑपरेशन सुरु असल्यामुळे सिरसमाध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे नेजिया, रंगडी आणि बाजेकां या गावांचा सिरसाशी संपर्क तुटला आहे.
- बाजारांमध्ये वर्दळ कमी आहे. लोक आपापल्या घरात टीव्ही समोर बसून क्षणाक्षणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित फोटोज

Next Article

Recommended