आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मुलायम यांच्या श्रीमंत सूनबाई, 2 वर्षांत झाली सासऱ्यापेक्षा दुप्पट संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रायपूर (छत्तीसगड)मध्ये झालेल्या एका सभेत पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्या पत्नीला उमेदवार न करण्याचे जाहीर केले. त्यांचे म्हणणे आहे की, वंशवाद संपवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तथापि, डिंपल यादव सध्या कन्नोजच्या खासदार आहेत. एवढेच नाही, तर मुलायम यांच्या कुटुंबातील त्या सर्वात श्रीमंत नेत्याही ठरल्या आहेत. divyamarathi.com आपल्या वाचकांना त्यांच्या संपत्तीशी निगडित काही फॅक्ट्स सांगत आहे.
 
दोन वर्षांत बनवली सासऱ्यापेक्षा दुप्पट संपत्ती
- 2012 मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री बनल्यानंतर रिकाम्या झालेल्या कन्नौजच्या जागेवरून त्या खासदार बनल्या होत्या.
- 2014 मध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत पुन्हा त्याच जागेवरून विजयी झाल्या.
- 2012 मधील निवडणुकीवेळी त्यांनी 9 कोटींची संपत्ती घोषित केली होती. त्यानंतर फक्त दोन वर्षांनीच 2014 मध्ये झालेल्या इलेक्शनवेळी त्यांची संपत्ती 28 कोटी रुपये एवढी होती.
- 2014च्या इलेक्शनमध्ये डिंपल यांचे सासरे मुलायमसिंह यांनी 16 कोटी रुपये एवढी संपत्ती घोषित केली होती.

2017 मध्ये पराभूत झाले मुलायम यांचे गणगोत
- 2017च्या यूपी इलेक्शनमध्ये मुलायम फॅमिलीच्या 6 नेत्यांनी उमेदवारी दाखल केली होती. लहान सून अपर्णा यादव लखनऊमधून, तर सरोजिनीनगरमधून अनुराग यादव. दोघांचा पराभव झाला.
- कुटुंबाच्या भांडणात एकटे पडलेल्या शिवपाल विजय मिळवणारेही एकटेच ठरले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मुलायम यांच्या कुटुंबात कोण किती श्रीमंत...
बातम्या आणखी आहेत...