आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडला ड्रायव्हर बलात्कारी बाबाचा, बहिणीसह राहतो डेऱ्यात; यामुळे झाली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबाच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली. - Divya Marathi
बाबाच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली.
श्रीगंगानगर - हरियाणातून बलात्कारी राम रहीमच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. या ड्रायव्हरच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरही डेऱ्याप्रमाणे डिझाइन केलेले आढळले. तो आपल्या बहिणीसह लहानपणापासून राम रहीमच्या डेऱ्यात राहत होता. त्याच्यावर डेऱ्यातील लँड क्रूझरला आग लावून ती नष्ट करण्याचा आरोप आहे. ड्रायव्हरचे नाव हरमेल सिंह असून तो राजस्थानच्या जैतसरचा राहणारा आहे.
- त्याच्या वडिलोपार्जित घरी जाऊन दैनिक भास्करच्या पत्रकारांनी पाहणी केली असता हे घर डेराशैलीमध्ये बांधलेले आढळले. पत्रकाराला घर आणि ड्रायव्हरच्या परिवाराचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापासून रोखण्यात आले. तुम्ही तुमची किमान बाजू तरी मांडा, याच बाबीवर हरमेलचे कुटुंब बोलायला तयार झाले.
 
असे आहे ड्रायव्हरचे घर
- गुरमित राम रहीम याच्या सिरसा येथील डेऱ्यात जसे चित्र होते, तसेच चित्र हरमेलच्या घरातही आढळले. येथे त्याचे आईवडील राहतात. हरमेलच्या वडिलांनी सांगितले की, हरमेलचा भाऊ गुरप्रीतची बाजारात टायरची दुकान आहे.
- हरमेलच्या बाबतीत गावकरी म्हणाले की, हे कुटुंब कित्येक वर्षांपासून डेऱ्याशी निगडित आहे. तिथेच हरमेल शिकला आणि नंतर बाबाचा ड्रायव्हर बनला.
- हरमेलच्या घरात जागोजागी बाबावर श्रद्धा व्यक्त करणारी प्रतीके, चित्रे आणि ओंकार, त्रिशूळ यासारखी काही धार्मिक चिन्हेही होती.
- हरमेलचे भाऊ गुरप्रीत म्हणाले की, माझ्या भावावरील सर्व आरोप निराधार आहेत. हां एवढे जरूर आहे की, लहानपणापासून मी डेऱ्याची सेवा करत आलो आहे. परंतु पोलिसांनी लावलेले आरोप एकदम चुकीचे आहेत.
 
शिक्षेच्या दिवशी सर्वात आधी याने लावली गाडीला आग 
- 28 ऑगस्ट रोजी जेव्हा सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्या. जगदीप सिंग यांनी डेराप्रमुख गुरमित राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्याच दिवशी डेऱ्याची लक्झरी गाडी डेरा मुख्यालयाच्या मागच्या गेटमधून बाहेर नेऊन रोडवर जाळण्यात आली होती. 
- आग लावणारे इतरही काही लोक, दुसऱ्या गाडीत स्वार होते. सर्वांनी मिळून लक्झरी गाडीला आग लावली आणि मग सर्व दुसऱ्या गाडीत स्वार होऊन फरार झाले.
- पोलिस सर्व आरोपींना पकडण्यात व्यग्र होते. पैकी एक आरोपी हरमेल सिंहला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...