आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासराच बनला सुनेचा पती, सांगितली मुलामुळे झाली लग्नाची 'मजबुरी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - सामाजिक बंधने तोडून 55 वर्षांच्या सासऱ्याने त्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीशीच लग्न केले. 4 दिवसांनी गावकऱ्यांना याचा खुलासा झाला. यामागचे कारण त्याला विचारल्यावर त्याने या लग्नाला मुलामुळे मजबुरीने केल्याचे सांगितले. आता हा सासरा-कम-पती घर सांभाळतो, तर त्याची पत्नी घर चालवण्यासाठी गावातल्या शेतात मजुरीला जाते.  DivyaMarathi.Com तुम्हाला रिकॉल स्टोरी सांगत आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण
हे प्रकरण गोरखपूरच्या डीहघाट गावातील आहे. येथे 13 जून 2017 रोजी निषाद नावाच्या व्यक्तीने त्याचा मोठा मुलगा दिलीपची पत्नी पुन्नू (33) हिच्याशी गुपचूप लग्न उरकले.
- 17 जूनला दोघांच्या या नात्याचा खुलासा गावकऱ्यांना झाला तेव्हा तो म्हणाला, हे लग्न करणे माझी मजबुरी होती. मुलाने दुसऱ्या मुलीशी प्रेम केले आणि लग्नही करून तिकडेच राहू लागला. या पत्नीला आणि पोराबाळांना त्याने वाऱ्यावर सोडले होते. त्यांना आधार देण्यासाठी आणि समाजाच्या वासनांध नजरा रोखण्यासाठीच मला तिच्याशी लग्न करावे लागले. 
- मुलाने सर्व संबंध तोडले आहेत, तो आता येथे राहत नाही. पण सुनेवर 4 मुलांची जबाबदारी आहे. या मुलांना आधार व्हावा म्हणून मी हे लग्न केले.
 
पती सांभाळतो घर, पत्नी पाहतेय कामधाम
- निशाद यांची तब्येत ठीक नसते, अशक्तपणामुळे त्यांना काम होत नाही. यामुळे 3 मुलांसह ते घरीच राहतात. दुसरीकडे, पत्नी पुन्नूदेवी मुलगी सुमनसह शेतात मजुरीला जाते.
 
गावकरी म्हणाले, सासरा-सुनेच्या संबंधांचा मुलाला होता संशय
- एकीकडे निषाद त्यांच्या मुलाला धोकेबाज म्हणतात, तर गावकरी मात्र त्यालाच दोषी मानतात.
- गावातील रहिवासी रामशरणने सांगितले, दिलीप कामधंद्याच्या शोधत अनेक शहरांत जाऊन काम करायचा. यादरम्यान निशाद आणि त्याच्या सुनेत जवळीक वाढत गेली. एकदा घरी परतलेल्या दिलीपने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मुलगा-सुनेत याच कारणामुळे नेहमी भांडणेही व्हायची.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...