आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा मेल्याने आईने केले दुसरे लग्न, सावत्र बाप 3 वर्षांपासून दररोज करत होता रेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्कर - पुष्करमध्ये एक नराधम आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर मागच्या 3 वर्षांपासून दररोज दमदाटी करून बलात्कार करत होता. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी अटक केली आहे. आरोपी राजेंद्र माली याला गुरुवारी कोर्टात सादर करण्यात आले असता, त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलिसांनुसार, पीडिता सध्या अजमेर येथील नारी निकेतनमध्ये बाल कल्याण समितीच्या देखरेखीत राहत आहे.
 
असे आहे प्रकरण
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, तिच्या वडिलांचे निधन लहानपणीच झाले होते. यानंतर तिच्या आईने राजेंद्र माळी नावाच्या माणसाशी दुसरे लग्न केले. सावत्र बाप तिच्यावर 2014 पासून दमदाटी करून घरातच रोज बलात्कार करत होता.
- त्याला विरोध केल्यावर तो प्रचंड मारहाण करायचा आणि जिवे मारण्याची धमकीही द्यायचा. पीडितेने याची माहिती तिच्या आईला आणि शेजाऱ्यांनाही दिली, पण कोणीच मदत नाही केली. मागच्या काही दिवसांत माहिती मिळाल्यावर मानव तस्करी युनिट प्रभारी सीआय अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात चाइल्ड लाइन व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी पुष्करमधील पीडितेच्या घरी धाड टाकली. 
- प्राथमिक चौकशीत पीडितेने आईवडील दररोज मारहाण करत असल्याचे व उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक अत्याचार करत असल्याचे गंभीर आरोप केले. टीमने लगेच कारवाई करत पीडितेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. तिला आपल्या संरक्षणात घेऊन अजमेर येथे बालकल्याण गृहात ठेवण्यात आले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पीडित मुलीची हृदयद्रावक आपबीती....
बातम्या आणखी आहेत...