आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासमोरच तरुणीवर 15 जणांचा गँगरेप, या कारणाने नराधमांनी तिला विवस्त्र करून तलावात नेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे कळते. - Divya Marathi
पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
दुमका (झारखंड) - येथे प्रियकरासह बाहेर फिरायला निघालेल्या तरुणीवर गतरात्री सामूहिक बलात्कार झाला. आरोपींनी प्रियकराला चाकूचा धाक दाखवला आणि तरुणीला एका बाजूला नेले. त्यांनी फोन करून आणखी 10 तरुणांना तेथे बोलावून घेतले. सर्वांनी एकेक करून तरुणीवर बलात्कार केला. या नराधमांनी बलात्काराच्या पूर्ण घटनेचा व्हिडिओसुद्धा बनवला. यानंतर पुरावे मिटवण्यासाठी तरुणीला तलावात अंघोळ घालून नग्नावस्थेत प्रियकरापाशी आणून सोडले. यानंतर सर्व आरोपी फरार झाले.
 
शोरूममध्ये काम करते तरुणी...
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय तरुणी एका शोरूममध्ये काम करते. रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला असून शारीरिक इजाही झाली आहे.
- पोलिस म्हणाले की, तिच्यावर तब्बल 15 जणांनी गँगरेप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वांची चौकशी केली जात आहे.
- डीएसपी अशोक कुमार सिंह म्हणाले की, पीडित तरुणी आणि तिच्या प्रियकराचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याआधारे 4 जणांना ताब्यात घेतले आहे.
- रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू आहेत. तरुणीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी खूप गंभीर आहे.
- रुग्णालयात पोहोचून दुमका नगर पोलिस प्रभारी मनोज कुमार, संजय कुमार मालवीय आणि बी. के. सिन्हा यांनी प्रकरणाची माहिती घेतली आणि ताब्यात घेतलेल्या मुलांची चौकशी केली आहे.
- पोलिसांनी सांगितले की, गँगरेप करणाऱ्यांनी पीडित तरुणीच्या प्रियकरालाही जबर मारहाण केली.
 
प्रियकराने सांगितली पूर्ण कहाणी...
- पीडितेचा प्रियकर म्हणाला की, ते दोघे फिरायला गेले होते. यादरम्यान रस्त्याच्या कडेला अचानक 6 मुले आली आणि त्यांनी दोघांना घेरले. त्यांनी आमचे दोघांकडे मोबाईल फोन मागितले. नकार दिल्यावर म्हणाले की, 5 रुपये काढा.
- यादरम्यान टोळक्याने दोघांचे मोबाइल हिसकावून घेतले. यानंतर कॉल करून आणखी 10 जणांना बोलावून घेतले. मग मात्र या गुंडांनी चाकू बाहेर काढला. चाकू प्रियकराच्या मानेवर ठेवला आणि तरुणीला फरपटत रस्त्याच्या कडेला नेले. 
- सर्व गुंडांनी मुलीवर आळीपाळीने रेप केला. यानंतर सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी जवळच्याच तलावात पीडित तरुणीला बळजबरी अंघोळ घातली.
- रेप आणि अंघोळ घातल्यानंतर गुंडांनी तरुणीला नग्नावस्थेत प्रियकरापाशी सोडून पोबारा केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी PHOTOS...  
बातम्या आणखी आहेत...