आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणी भैया-भैया ओरडत राहिली, नराधम आळीपाळीने करत होते रेप, व्हिडिओही वायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर - येथे कटरामध्ये एका गँगरेप केसमध्ये 8 सेकंदांच्या एका व्हायरल व्हिडिओत क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडण्यात आल्या. तरुणी सारखी ओरडत होती. नराधमांना भैया-भैया म्हणून सोडून देण्याची विनवणी करत होती. तिला विश्वास होता की हे नराधम तिला भैय्या म्हटल्यावर सोडून देतील. पण हे राक्षस तिचे तोंड बंद करून तिला जिवे मारण्याची धमकी देत राहिले आणि रेप करत राहिले.
 
दोन आरोपींनी बनवला व्हिडिओ...
- तरुणीने सांगितले की, घटनेच्या दरम्यान दोघे जण व्हिडिओ बनवत होते. यातील एकाने तो व्हायरल केला.
- हे प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा काही लोकांनी पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
- पीडितेच्या एका नातेवाइकाने म्हटले की, हे प्रकरण दाबण्यासाठी एका आरोपीने पैशांचे आमिष दाखवले.
- धुडकावून लावल्यावर आरोपी तरुणांना पळून जाण्यात मदत करण्यात आली.
 
पोलिसांनी घेतली दखल
- गावातील एका व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तरुणीचा जबाब आणि व्हायरल व्हिडिओला पुरावा मानून गुन्हा दाखल केला.
- ही घटना महाअष्टमीच्या रात्री बेनिबाद-कटरा रोडवर घडली. कुटुंबीय बदनामीमुळे गप्प होते.
- घटनेच्या 36 तासांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कुटुंबाने तोंड उघडले. यानंतर पंचायत बसली.
 
पळून जाताना 3 नराधमांना पकडले
- सूत्रांनुसार, आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. तेवढ्यात तिघांनाही पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.
- तिघांची मीनापूर पोलिस स्टेशनमध्ये ठेवून चौकशी केली जात आहे. चौथ्या आरोपीच्या अटकेसाठी धाडसत्र सुरू आहे. 
- एसएसपी विवेक कुमार म्हणाले की, गँगरेप कांडचा मुख्य आरोपी अनिश कुमार, सचिन कुमार आणि गगन कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
 
शेतात पडली होती बेशुद्ध
- पीडितेच्या वहिनींनी सांगितले की, अगोदर दोघांनी एका भामट्याच्या  घरी तिच्यावर दुष्कर्म केले. मग घरी सोडण्याच्या बहाण्याने आणखी दोन जणांसह 4 जण तिला शेताकडे घेऊन गेले. तिथे बलात्कारानंतर बेशुद्धावस्थेत तिची नणंद रात्री उशिरापर्यंत पडून होती.
- शुद्धीत आल्यावर जवळच्याच एका गावकऱ्याच्या घरी गेली. तिची हालत पाहून त्या गावकऱ्याने रात्रभर तिला आश्रय आणि धीर दिला. दुसऱ्या दिवशी घरी आणून सोडले.
- हा गुन्हा दाखल झाल्यावर गावकरी म्हणाले की, आरोपींना फाशीची शिक्षाही कमीच होईल.
- आरोपी अनिशचे काका राजेश कुमार म्हणाले की, मुलीला न्याय मिळण्यासाठी ते अनिशच्या अटकेसाठी पोलिसांची पूर्ण मदत करतील.

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये पाहा, संपूर्ण दुर्दैवी घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...