आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी पोलिस भरतीसाठी धावली; पण ठरली नराधमांच्या वासनेची शिकार, अशी आढळली डेडबॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभरापासून तरुणी पोलिस भरतीसाठी धावत होती. - Divya Marathi
वर्षभरापासून तरुणी पोलिस भरतीसाठी धावत होती.
पाटणा - बिहारच्या अरवल जिल्ह्यातील तरुणी पोलिसांत भरती होऊन महिलांना न्याय आणि सुरक्षा देऊ इच्छित होती. परंतु ती स्वत:च नराधमांच्या वासनेची शिकार ठरली. तिची हत्या करण्यात आली. ही घटना तेलपाच्या पिहोर गावातील आहे. राधेश्याम साव यांची मुलगी पोलिसांत भरती होऊ इच्छित होती. अभ्यासात हुशार आणि स्वभावाने सुशील असलेल्या या तरुणीची पोलिस भरतीमध्ये निवडही झाली होती. मागच्या वर्षभरापासून ती रोज सकाळी गावाच्या बाहेर रस्त्यावर रनिंग करायची.
 
मृतदेहावर आढळल्या जखमा
- शनिवारी सकाळीही ती रोजच्या प्रमाणे गावाबाहेर रनिंग करत होती, पण घरी परत आली नाही.
- मुलीचे वडील राधेश्याम म्हणाले की, मुलगी दुपारपर्यँत परत नप आल्याने मी गावातील काही माणसांसह तेलपाला गेलो आणि पोलिसांत एफआयआर नोंदवून तिचा शोध घेण्याची विनंती केली.
- तेथे पोलिस म्हणाले की आताच एफआयआर नोंदवू नका. तुम्ही गावातल्या लोकांना घेऊ तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. पोलिसही तुमच्यासोबत असतील. 24 तासांत जर ती आढळली नाही तर एफआयआर दाखल करू.
- मग गावकऱ्यांनी रात्रभर तिचा शोध घेतला. सकाळी हसपुरामध्ये तिचा मृतदेह आढळला.
- पोलिसांनी मृतदेह पाहून बलात्काराची शक्यता व्यक्त केली. पोलिस सूत्रांनुसार, मुलीवर आधी रेप करण्यात आला आणि नंतर तिचा खून करण्यात आला. मुलीच्या तोंडातून रक्त निघत होते आणि तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या.
 
संतप्त जमावाने केला रास्ता रोको
- चिडलेल्या लोकांनी मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर रास्ता रोको केला.
- गावकरी म्हणाले, पोलिसांनी लगेच केस नोंदवून वेगाने छापेमारी केली असती तर आज मुलगी जिवंत असती. एका कर्तृत्ववान मुलीच्या खुनामुळे पूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
 
रेप आणि प्रेमप्रकरणाच्या अँगलनेही पोलिस करताहेत तपास
- डीएसपी संजय कुमार म्हणाले की, पोलिस रेप आणि प्रेमप्रकरणाच्या अँगलनेही तपास करत आहेत. खुनाशी निगडित काही पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. पोस्टमॉर्टमची रिपोर्ट अजून आलेली नाही. रिपोर्ट आल्यावर खुनाशी संबंधित आणखी माहिती मिळेल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...