आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Girl Forced To Sex With Customers Told Reality Of Massage Parlour And Spa Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कस्टमरला \'खुश\' कर, तरच पगार मिळेल; हे आहे मसाज पार्लरचे जळजळीत वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - येथे सुरू असलेल्या तमाम स्पा सेंटर्स, मसाज पार्लर्सची हकिगत आता समोर आली आहे. येथे एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या आसामच्या विधवा महिलेने मसाज पार्लर मालकावर नोकरी देणे आणि सॅलरीच्या बदल्यात कस्टमरशी सेक्स करण्यासाठी मजबूर केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने पार्लर मालक आणि एका महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

कस्टमरला खुश कर, तरच मिळेल पगार
- मूळची आसामची राहणारी विधवा महिला रोली (बदललेले नाव) हिने एसएसपी कार्यालयात 7 स्टार स्पा सेंटरचा संचालक अमित आणि त्याची मैत्रीण प्रिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
- पीडिता म्हणाली की, पतीच्या मृत्यूनंतर कामाच्या शोधात ती आग्रामध्ये आली होती. येथे 7 स्टार स्पा सेंटरचा संचालक ताजगंजचा अमित कुमार याने तिला आठ हजार रुपये पगाराने मसाजसाठी नोकरीवर ठेवले.
- महिना पूर्ण झाल्यावर त्याने केवळ 6 हजारच तिला दिले. यानंतर बळजबरी ग्राहकांशी सेक्स करण्यासाठी मजबूर केले जाऊ लागले.
- या कामासाठी अमितची मैत्रीण प्रियाही जबरदस्ती करायची. महिलेने विरोध केल्यावर पगार द्यायला त्यांनी नकार दिला. तिला सांगण्यात आले की, स्पासोबतच कस्टमरला खुश करशील, तरच तुला पगार देऊ.
- येथे आणखीही तरुणी आहेत आणि त्यांच्याकडूनही बळजबरी हे काम करून घेतले जात आहे. त्यांना बदनाम करण्याची धमकी दिली जातेय आणि सेक्स वर्क करून घेतले जात आहे.

 

काय म्हणाले पोलिस?
- एसएसपी कार्यालयातून हे प्रकरण तपासासाठी महिला पोलिस अधिकारी उदयराज यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. सीओ उदय राज म्हणाल्या, तपास सुरू असून, पूर्ण तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल.

 

काय म्हणाला आरोपी?
- याप्रकरणी आरोपी स्पा संचालक अमित म्हणाला की, आम्ही तिला सर्वात जास्त 6 हजार पगार देत होतो. इतरांना तर 5 हजारच देतो. आमच्या येथे कोणतेही चुकीचे काम होत नाही. तिचे रिसेप्शनिस्ट प्रियाशी भांडण झाले होते, या कारणामुळे तिने हे आरोप लावले आहेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून पूर्ण प्रकरण.... शेवटच्या स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...