आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तासभर तिच्या देहावरून फिरवायचा लिंबू, तरुणीने सांगितला ढोंगी बाबाचा कारनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर- 11 वीत शिकणाऱ्या तरूणीच्या शरिरात भुताने वास्तव्य केल्याचे सांगून ढोंगी बाबाने तिला जनावरांप्रमाणे वागणून देत लैंगिक संबंध बनवल्याची घटना मसोर आली आहे. 6 नोव्हेंबरला तरूणीने ढोंगी बाबाविरोधात लैंगिक आत्याचाराची तक्रार केली, परंतु पोलिसांनी ना केस दाखल केली, ना पूढे काही करावाही केली. तरूणीने सांगितले की, ढोगी बाबाने भुत पळवण्याच्या कारण करून तिच्यावर लैंगिक आत्याचार केला आणि त्याचा हा प्रताप उघडकीस येऊ नये म्हणून आई-वडिलांवर 6 लाखांचे कर्ज घेतल्याचा खोटा आरोप बाबाने लावला आहे.


तीन वर्षांपूर्वी झाली सुरूवात...
- पीडितेने सांगितले की, तिच्यावरील आत्याचाराची कथा तीन वर्षांपूर्वी सूरू झाली होती. तिचे आई वडिल तिला उपचारासाठी दर मंगळवार आणि शनिवारी ढोंगी बाबाकडे घेऊन जात होते. सुरूवातील बाबा तिच्या शरिरावर लिंबून पिळून उतारा करत होता.
- खूप दिवस झाले तरी काहीच फायदा झाला नाही, तर बाबा म्हणाला डायन भायनाक आहे, यामुळे मुलीला घरातच राहावे लागेल. या कामात ढोंगी बाबाची पत्नीनेही त्याला साथ दिली. त्या दोघांनी आई-वडिलांना विश्वासात घेऊन सांगितले की, ते तिला आपल्या मुलीप्रमाणे जवळ ठेवतील.
- तरूणीच्या आई-वडिलांनी अंधविश्वास ठेवून तिला ढोंगी बाबाकडे ठेवले. यानंतर बाबाने भूत उतारण्याच्या बाहाण्याने तिच्या शरिराशी खेळने सूरू केले.

 

आत्याचाराला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न...
- प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी पीडितेवर भूत उतरवण्याच्या निमित्ताने बलात्कार होत होता. पीडितेने सांगितले की, या दरम्यान बाबा तिला आई-वडिलांना देखील भेटू देत नव्हता.
- तिने अनेकवेळा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला यश आले नाही. आपल्यावर होणाऱ्या आत्याचाराला कंटाळून तरूणीने अनेकवेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला.

 

बाबाकडून अशी केली सूटका...
तीन महिण्यांनतर पीडित तरूणी बाबाच्या घरातून पळून आपल्या मावशीकडे पोहोचली. तिच्या पोहोचण्याआधी बाबा तिथे पोहोचला, त्याने तितेच तिला मारहाण केली आणि आपल्यासोबत परत घेऊन गेला.
- मारहाणीला विरोध करणाऱ्या नातेवाइकांना बाबाने तिच्या अंगात भुत आले आहे असे सांगून शांत बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी नातेवाईकांनी त्याचे ऐकले नाही. मुलीने ओरडून ओरडून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविषयी नातेवाइकांना सांगितले, प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून बाबाने तेथून काढता पाय घेतला. नंतर मुलीच्या नातेवाईकांना धमकी देऊ लागला. तसेच 6 लाख रूपयांची उधारी सांगून तंग करू लागाला. पीडित मुलीने सखी नावाच्या एका एनजीओच्या मदतीने तक्रार दिली, परंतु पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.


पोलिसांवर कार्यवाही न करण्याचा आरोप...
- पीडित तरूणीला मदत करणाऱ्या एनजीओने सांगितले की, आदर्शनगर पोलिस ठाण्यात या मुलीवरील आत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेचे अल्पवयीन असल्यापासून ते सज्ञान होईपर्यंत शोषण कऱण्यात आले आहे, तरीही पोलिस आरोपीविरोधातील तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करत नाही आहेत. 
-  आदर्शनगर पोलिस ठाण्याचे टीआय यांनी सांगितले की, पीडित तरूणी आणि तिच्या नातेवाइकांना जबाबासाठी बोलवण्यात आले आहे. जबाबावरून केस दाखल करून कार्यवाही करण्यात येईल.

 

पुढील स्लाइडवर वाचा, भूत उतारण्याच्या बाहाण्याने तिला कपडे काढण्यास सांगत होता बाबा...

बातम्या आणखी आहेत...