आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या मैत्रिणीलाच पळवले बापाने, पीडितेने सांगितली ही कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - येथील चौपासनी हाउसिंग बोर्ड परिसरातील उद्यान अपार्टमेंट राहणाऱ्या एका मुलीसोबत एक विचित्र घटना घडली. दोन तरुण आणि एक तरुणी रविवारी सकाळी 7 वाजता तिच्या घरी आले. त्यातील एकाने स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले आणि मुलीला मारहाण करून तिला भरदिवसा बळजबरी जीपमध्ये बसवले. ते तिला भढवासियाच्या एका घरात घेऊन गेले.
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये वाचा, काय काय घडले या तरुणीसोबत... तिची आपबीती
 
बनावट पोलिस बनून आले आरोपी
- सूत्रांनुसार, अशोक उद्यानाच्या मागच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला शुक्ला (19) आपल्या आईसह घरातच काम करत होती. यादरम्यान एक तरुणीसह तिघे जण आले आणि घराचा मुख्य दरवाजा उघडायला लावून महिमाला मारहाण करत ते पोलिस स्टेशनमधून आल्याचे सांगितले. त्यातील एका वयस्कर व्यक्तीने सांगितले की, तो मंडोर पोलिस स्टेशनचा सीआय आहे. तिची मैत्रीण खुशबू गहलोतच्या बेपत्ता होण्याबाबत चौकशीसाठी आले आहेत. तरुणीने चालण्यास नकार दिला, तर या बनावट पोलिसाने तिला चापटा मारल्या. 
- महिमाला तिची वाचवण्यासाठी तिची आई पुढे आली तर आरोपींनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. आणि म्हणाले की, मध्ये पडशील तर तुलाही अटक करून घेऊ जाऊ. तिची आई घाबरली. यानंतर महिमाला त्यांच्यासोबत आलेल्या जैविका परिहारने पकडले आणि बळजबरी जीपमध्ये बसवून भदवासियाला नेले. येथे खुशबूचे वडील खेमसिंह आणि अमरसिंह भेटले. खेमसिंहने महिमाला विचारले की, खुशबू कुठे आहे? खरे खरे सांग, तू माझ्या मुलीला घरातून पळून जाण्यात काही मदत केलीयेस का? याला महिमाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
- या लोकांनी महिमाला दमदाटी केली, धमकीही दिली, पण जेव्हा महिमा खूप घाबरली तेव्हा खेमसिंहने नमते घेत तिच्याकडून राखी बांधून घेतली.
- म्हणाला, तू माझी बहीण आहे आणि तुझी मैत्रीण तुझ्या भावाचीच मुलगी समज. आता तिच्याबाबत सर्वकाही सांगणे तुझे कर्तव्य आहे. पण महिमाला काहीच माहीत नसल्याने तिने तसे स्पष्ट सांगितले. 
- यादरम्यान महिमाची आई मंडोर पोलिस स्टेशनला गेली आणि तिथून महिमाला फोन केला. यामुळे आरोपी घाबरले आणि त्यांनी तिला सहीसलामत घरी आणून सोडले.
 
प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे...
उद्यान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून आम्ही प्रकरणाची नोंद केली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक होईल.
- उम्मेदसिंह, एएसआय, चौहाबो पोलिस स्टेशन
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये वाचा, काय काय घडले या तरुणीसोबत... तिने सांगितलेली आपबीती
बातम्या आणखी आहेत...