आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांपासून बाप करत होता रेप, सत्य समोर आणण्यासाठी मुलीने उचलले हे बोल्ड पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांशी - नुकत्याच झालेल्या उद्योगपतीच्या अपहरणानंतर झांशी शहर चर्चेत आहे. गतवर्षी झांशीला लागून असलेल्या उरई जिल्ह्यात एक प्रकरण समोर आले होते, ज्यात नराधम बापाने पोटच्याच मुलीवर केलेल्या बलात्काराने बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला होता. क्राइम सिरीजमध्ये divyamarathi.com या घटनेचा डिटेल पंचनामा देत आहे.
 
बापाचे पाप समोर आणण्यासाठी मुलीने स्वत:च बनवला होता बलात्काराचा MMS
उरई जिल्ह्याच्या बघौरा परिसरात राहणारी चांदणी (नाव बदललेले आहे) 2016 मध्ये बीएस्सी करत होती. तिने तिच्या बापावर बलात्काराचा आरोप केला होता. एवढेच नाही, तर तिने आपल्या आई सत्य पटवून सांगण्यासाठी स्वत:च बलात्काराचा व्हिडिओही बनवला होता.
- चांदणी म्हणाली, मला ज्याने जन्म दिला, त्यानेच माझे आयुष्य बरबाद केले. मला त्याला (बापाला) अचानक मारायचे नव्हते. त्याला सर्वांसमोर रस्त्याच्या मधोमध फाशी दिली जावी. त्याला यामुळे लोकही बेदम मारतील, ज्यामुळे त्याला स्वत:च्या कुकृत्याची जाणीव होईल.
- सध्या तो जेलमध्ये आहे, याचा मला आनंद वाटतोय. दुसरीकडे, चांदणीची आई म्हणतेय की, माझ्या नवऱ्याला गोळी मारली पाहिजे. मी कधीच त्या माणसाची बाजू घेणार नाही. पोलिसांनी सरळ त्याला गोळीने उडवावे. मला तो माझा नवरा असल्याचे दु:ख वाटतेय.
 
प्रकरणातील सध्याच्या घडामोडी
- उरईचे एसओ नीलेश कुमार यांनी सांगितले की, बलात्कार पीडिता काही दिवस एकटीच राहिली. आम्ही सर्व तिच्या शिक्षणात मदत करत होतो. यानंतर ती आपल्या आईसह घरी गेली. आरोपी सध्या जेलमध्ये आहे.
- दुसरीकडे, चांदणीच्या आईने सांगितले की, मुलगी आता आमच्यापासून वेगळी राहातेय. तिने दुसरीकडे जिथे तिला कोणीच ओळखत नाही अशा जागी किरायाने खोली केली आहे. स्वत:चा खर्च भागवण्यासाठी ती जॉबही करतेय.
- या घटनेमुळे मुलीचा बाप या नात्यावरूनच विश्वास उडाला आहे. ती आता कोणावरच भरवसा ठेवत नाही.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, कशी घडली होती दुर्दैवी घटना आणि मुलीची आपबीती...
बातम्या आणखी आहेत...