आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने प्रियकराला पाठवले अश्लील फोटोज, त्याने खंडणीसाठी मित्रांकडून केले व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिम्बॉलिक इमेज. - Divya Marathi
सिम्बॉलिक इमेज.
लुधियाना - प्रायव्हेट स्कूलमध्ये 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने (14) आपल्या मित्राला प्रायव्हेट फोटो पाठवले आणि मग मुलाने ते सगळीकडे व्हायरल केले. त्याच्या मित्रांनी मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या बिझनेसमन वडिलांना 4 लाखांची मागणी केली.
 
आयटी अॅक्टसहित अनेक कलमांखाली गुन्हा दाखल
- याप्रकरणी मुख्य आरोपी मुनीश, राज (बदललेली नावे) यांच्यासह इतर चार जणांवर सिटी पोलिसांनी आयटी अॅक्टसह इतर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. 
- पोलिस म्हणाले, याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच पूर्ण खुलासा होईल. 
-अटकेतील तरुणांपैकी मुलीचा जिवलग मित्र असलेला 17 वर्षांचा राज (बदललेले नाव) बिझनेसमनचा मुलगा आहे. तथापि, फोटोज व्हायरल करणारा मास्टरमाइंड 30 वर्षांचा मुनीशही पेट्रोल पंप मालकाचा मुलगा आहे. या दोघांशिवाय पोलिसांनी इतर 2 जणांना ताब्यात घेतले आहे.
 
आरोपींनी राजकीय दबाव आणला...
- आरोपी राज आणि मुनीश यांच्याशिवाय एक फोटो स्टुडिओ मालकाचा मुलगा आणि भंगार व्यावसायिकाचा मुलगाही या कटात सामील आहे. आरोपी तरुणांच्या कुटुंबीयांनी राजकीय नेत्यांना शिफारस करून केसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी राजकीय दबाव झुगारला.
नोट: रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिक फोटो वापरले आहेत.
 
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये पाहा, आरोपींनी कसे व्हायरल केले मुलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...