आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तू जवळ आली की मला कंट्रोलच होत नाही' - अंगावर हात टाकून म्हणायचा शिक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - यूपीच्या राजधानीत स्कूल टीचरने एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण समोर आले. ग्रामर शिकवण्याच्या नावावर मुलींशी गैरवर्तन करणारा शिक्षक डी. के. सिंह याचा मुलीने पर्दाफाश केला आहे. आरोपी टीचर गोमतीनगर या पॉश परिसरातील टी.डी. गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये शिकवतो.
 
अगोदरही अशा चाळ्यांमुळे गेली होती नोकरी
- याआधी तो शहराच्या अॅनी बेझंट कॉलेजमध्ये शिकवायचा. तेथेही त्याच्याविरुद्ध विद्यार्थिनींनी अश्लील चाळे करत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला तेथून टर्मिनेट करण्यात आले होते.
- एकदा नोकरी गमावल्यावरही तो सुधारला नाही. बुधवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिची चांगलीच धुलाई केली.
- पालक म्हणतात की, यात शाळेची चूक आहे, या माणसाचा रेकॉर्ड खराब असतानाही त्यांनी त्याला शिक्षकाची नोकरी दिली.
 
खांद्यावर हात ठेवून म्हणायचा - मला कंट्रोलच होत नाही...
- डी.के. सिंह प्रत्येक मुलीची छेड काढत होता. परंतु एक मुलगी शशी (बदललेले नाव) वर त्याची जास्तच वाकडी नजर होती.
- शशी म्हणाली - तो आम्हाला बेबी म्हणून बोलवायचा. तो नेहमी मागून यायचा आणि माझ्या खांद्यावर हात ठेवायचा. मला खूप खटकायचे. मी हिंमत करून त्याला विचारले की, सर तुम्ही असा हात का ठेवता? तो म्हणाला- 'तुझ्या जवळ आलो की माझा ताबाच सुटतो! मला कंट्रोलच होत नाही.'
 
राम रहीम तुझ्यासाठीच तळमळतोय
- शशी म्हणाली की, राम रहीम केस सुरू असताना मी वर्गात म्हणाले की - सर राम रहीम जेलमध्ये गेला. तर तो म्हणाला की- अरे राम रहीम तर तुझ्यासाठीच तळमळतोय.
- मी त्याचा इशारा समजले. मी म्हटले- नाही सर, तुम्हीही त्याच्याकडे जाणार आहात. यावर त्याला राग आला आणि म्हणाला- मला वाटते की तुला उचलून घेऊन जावे. मी काहीही करू शकतो, माझे कुणीच वाकडे करू शकत नाही.
-शशि म्हणाली, सर्व विद्यार्थिनींनी या शिक्षकाच्या विरोधात शाळा व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार दिली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. मग मुलींनी सरळ भेट घेऊन त्यांना सांगितले तर मॅनेजरने उलट त्यांनाच शिव्या देऊन तुमचाच दोष असल्याचे सांगितले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या मुलींसोबत कसे चाळे करायचा हा शिक्षक...
बातम्या आणखी आहेत...