आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरची मैत्री तरुणीला नडली, भामट्याने फोटो एडिट करून केले ब्लॅकमेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड) - दुर्ग जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला फेसबुकवर फ्रेंडशिप करणे महागात पडले. ज्या मुलाशी तिने फ्रेंडशिप केली त्यानेच अगोदर तिचा फोटो एडिट केला आणि मग ब्लॅकमेल करणे सुरू केले. हद्दच झाली जेव्हा त्या मुलाने अल्पवयीन मुलीला तब्बल 3 लाखांची मागणी केली. 
 
घरातून चोरले 3 लाख रुपये
- मुलाने 5 महिन्यांआधी फेसबुकच्या माध्यमातून मुलीशी फ्रेंडशिप केली. त्यानंतर त्याने तिच्या प्रोफाइलवरील फोटो एडिट करून अश्लील फोटो बनवले अन् तिला ब्लॅकमेल करू लागला.
- सुरुवातीला तो कमी पैशांची मागणी करत होता, पण नंतर त्याने एकदम 3 लाखांची मागणी केली.
- मुलीचे पैसे गोळा करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर तिने घरातल्याच दागिन्यांवर डल्ला मारला अन् मुलाच्या हवाली 3 लाख रुपये केले.
 
मुलीला केले किडनॅप
- या प्रकरणाला नवे वळण लागले. जेव्हा 6 ऑगस्टला आरोपी कुंदन रज्जानीची आई गीता रज्जानी, भाऊ करण आणि देवा रज्जानी यांनी सकाळी अल्पवयीन मुलीला फोन करून धमकी दिली व रायपुरातील आपल्या घरी पैसे घेऊन बोलावले.
- अल्पवयीन युवती धमकीच्या भीतीने रायपुरात पोहोचली. तिथे गेल्यावर तिन्ही आरोपींनी तिला किडनॅप करून घरात बंद केले. काही तासांनी मुलगी जेव्हा घरी आली नाही, तेव्हा घरच्यांनी बदनामीच्या भीतीने पोलिसांची मदत न घेता एका पोलिस मित्राला सगळे सांगितले. 
-त्याने तिचा शोध घेतल्यावर मुलगी आरोपी कुंदन रज्जानीच्या घरात आढळली.
- या प्रकरणाची सिटी कोतवाली दुर्ग पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत प्रकरणातील आरोपीची आई त्याच्या दोन्ही भावांना अटक केली. तर मुख्य आरोपी कुंदन रज्जाक सध्या दुसऱ्याच एका केसमध्ये रायपूर सेंट्रल जेलमध्ये बंद आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, कशी घडली होती ही घटना...
बातम्या आणखी आहेत...