आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नदारी वधूने सांगितले हे सत्य, वरासह सर्व वऱ्हाडींना बसला जबर धक्का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश)- लग्नाची सर्व तयारी झालेली होती. विवाहासाठी तयार असलेला युवक आपल्या नवरीची वाट पाहात होता. नवरी येते आणि नवरदेवाच्या कानात असे काही सांगते, की आनंदाचे वातावरण क्षणात गंभीर होऊन जाते. याचाच फायदा उचलत नवरी पोबारा करते. DivyaMarathi.com ही घटना रिकॉल करत आहे.
 
असे आहे प्रकरण
- एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील फरीहा पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.  19 वर्षांचा युवक विनोदचे लग्न करायचे होते. कुटुंबियांनी विवाह जुळविण्यासाठी मध्यस्थ अशोकला संपर्क केला. 
- अशोकने सांगितले, शेजारच्या गावात एक चांगली मुलगी आहे, मात्र लग्नाचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल. वराचे शेतकरी वडील तयार झाले. फिरोजाबाद येथील एका मंदिरात मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम झाला. मुलाला मुलगी पसंत पडली. 
- त्यानंतर मध्यस्थ अशोकने लग्नाचा खर्च आणि त्याचे कमिशन असे 1 लाख 25 हजार रुपये वर पित्याकडून घेतले. लग्नाची तारीख ठरली. 14 जानेवारी रोजी नगला गावातील शाळेत वऱ्हाड पोहोचले. मात्र तिथे ना लग्नाची तयारी होती ना, मुलीचे कुटुंब होते. 
- मुलाच्या नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावर कळाले, की या नावाची मुलगी आणि तिचे कुटुंब गावात राहात नाही. मध्यस्थ अशोकला फोन केला तर त्याचा फोन बंद होता. दोन तासानंतर अशोकचा फोन लागला. त्याने विनोदला सांगितले की तो मुलीला घेऊन येत आहे. 
- अशोकने हेही सांगितले की मुलीच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्यामुळे लग्न विधी मुलाच्याच गावी मढा येथे करु. वऱ्हाड मुलीशिवाय आपल्या गावी परत आले.
 
मुलगी कानात म्हणाली, मी धंदेवाली 
- रात्री साधारण 12 वाजता अशोक त्याच्या एका साथीदारासह मुलीला घेऊन नवरदेवाच्या घरी पोहोचला. मुलाच्या घरी लग्नाची सर्व तयारी झालेली होती. वर लग्नासाठी तयार होता. सर्वजण वाट पाहात होते ते नवरीची. 
- तेव्हाच मुलगी आली आणि तिने सांगितले, मी धंदेवाली आहे. सोबत आलेले लोक दलाल आहेत. कोठा चालवणाऱ्याने मला येथे पाठविले आहे.
 
संधी मिळताच फरार झाली वधू 
- यानंतर काय व्हायचे होते. सर्व लोकांनी मिळून अशोक आणि त्याच्या साथीदाराला मारहाण सुरु केली. तेव्हाच संधी साधून वधून पोबारा केला. यानंतर फरिहा पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली. 
- पोलिस निरीक्षक मुनीष चंद्र यांनी सांगितले, की वराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी त्यांचा दूरचा नातेवाईक आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये, इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या प्रकरण..
बातम्या आणखी आहेत...