Home »National »Other State» Gurmeet Ram Rahim Is Fond Of Opium And Liquor Ramrahimcrime

हनीप्रीतचा मधुचंद्र 'बाबा'मुळे असा राहिला अधुरा, नातेवाइकाचा खळबळजनक खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 01:23 AM IST

  • बलात्कारी बाबा आणि त्याची 'हनी'प्रीत.
चंदिगड - बाबा राम रहीमचा मुलगा जसमित. त्याचा मेहुणा भूपेंद्र गोराने गंभीर आरोप केले आहेत. भूपेंद्र गोरा म्हणाला की, राम रहीमने हनीप्रीतचे लग्न विश्वास गुप्ताशी लावले, पण तिला विश्वाससोबत मधुचंद्रही साजरा करू दिला नाही. स्वत:च तिला नवऱ्याच्या घरातून घेऊन गेला. जेव्हाकेव्हा विदेशात जायचा, तेव्हा हनीप्रीतलाच सोबत न्यायचा. एवढेच नाही, बाबाचा नातेवाईक असलेला भूपेंद्र असेही म्हणाला की, बाबा राम रहीम अफू आणि दारूचा खूप शौकिन होता.
 
- बलात्कारी रामरहीमच्या सुनेचा- हुसनमितचा कझिन असलेल्या भूपेंद्र गोराने खुलासा केला की, फरार असलेली हनीप्रीत कदाचित मुंबईत असू शकते. मुंबईत हनीप्रीतच्या नावे राम रहीमने अनेक फ्लॅट खरेदी केलेले आहेत.
- भूपेंद्र गोरा म्हणाला की, हनीप्रीतने अगोदर विश्वास गुप्ताच्या माध्यमातून राम रहीमशी जवळीक वाढवली. जेव्हा ही जवळीक खूप वाढली आणि त्यांच्या संबंधांबाबत चर्चा होऊ लागली, तेव्हा राम रहीमने 2009 मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करून हनीप्रीतला त्याच्या दत्तक मुलगी घोषित केले. हनीप्रीतने राम रहीमकडे फिल्म स्टार बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग काय, बाबाने तिच्यासाठी भलेमोठे स्टेडियम, सेट उभारून दिले. या स्टेडियममध्ये बसण्याचे 10-10 लाख रुपये घेतले जाऊ लागले. आणि मग येथे चित्रपटांची शूटिंग सुरू झाली.
- असेच आरोप पंजाबातील एक साधू गुरदास तूर यांनी लावले आहेत. ते म्हणाले की, कायदा मोडण्याची राम रहीमची परंपरा राहिली आहे. तो असे प्रत्येक काम करायचा, जे कायद्याने गुन्हा आहे. डेऱ्यामध्ये पशुपक्ष्यांना कैदेत ठेवणे याचे मोठे उदाहरण आहे.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या 'जोडगोळी'चे आणखी फोटोज...

Next Article

Recommended