Home »National »Other State» Gurmeet Ram Rahim Lived Like A King With Shaan And Shaukat In Sirsa

बाबाचा 'ताजमहाल' पाहून शोध पथकही झाले दंग, नेत्यांना खुश करण्यासाठी लक्झरी कमरे

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 19:34 PM IST

सिरसा - डेरा सच्चा सौदामध्ये सुरू असलेल्या सर्च ऑपरेशननंतर बाबा गुरमित राम रहीमचे सत्य समोर येऊ लागले आहे. रंगेल, शौकीन असलेला बलात्कारी बाबा आणि हनीप्रीतचे ऐश्वर्य पाहून तपासणी पथकही आश्चर्यचकित झाले. बाबाचा महाल एखाद्या राजा-महाराजापेक्षा कमी नव्हता. महालात महागड्या आणि अत्याधुनिक सुविधा होत्या. येथे एक सीक्रेट सुरूंगही आढळली, जी थेट साध्वींच्या आश्रमापर्यंत जात होती.

पुढे वाचा... काय काय होते राम रहीमच्या डेऱ्यामध्ये...

- सूत्रांनुसार, डेऱ्यातील रिसॉर्टमध्ये ताजमहाल व्हिलाला सर्वात जास्त सिक्युरिटी दिली जात होती. येथे कुणालाच येण्याची परवानगी नव्हती. कारण, खुद्द राम रहीम येथे मुक्कामी असायचा. या व्हिलामध्ये जे बेड लावलेले आहेत. त्यांचा आकार गोल आहे.
- व्हिलाच्या एका कोपऱ्यात लक्झरी स्विमिंग पूल आहे, तर दुसरीकडे हाय सिक्युरिटी ग्लास लावलेले आहेत.
- राम रहीमच्या रिसॉर्टमध्ये राजकीय पुढाऱ्यांना खुश करण्यासाठी सुपर लक्झरी कमरे वापरले जायचे. हे कमरे सामान्यांना ना दाखवले जायचे, ना त्यांना किरायाने दिले जायचे.

हनीप्रीतचा कमरा आणि बुटिकही होता आलिशान
- सर्च ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी टीमने बाबाची मानलेल्या मुलगी हनीप्रीतच्या बुटीकला सील केले. बुटीकमध्ये महागडे ड्रेस आणि काही मौल्यवान वस्तू आढळल्या.
- हनीप्रीतचा कमराही आलिशान होता. तीही राजसी थाटबाटात राहायची.

पुढे वाचा, गुरमित राम रहीमच्या महालाशी निगडित पूर्ण स्टोरी...

Next Article

Recommended