Home »National »Other State» Gurmeet Ram Rahim Sirsa Dera Pitaji Ki Maafi Means Rape

तरुण साध्वींना अशी 'माफी' द्यायचा राम रहीम, पवित्र करण्यासाठी करायचा रेप

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 11:38 AM IST

  • बाबा म्हणायचा, मी परमेश्वर आहे, तुला असेपवित्र करणार आहे.
चंदिगड/नवी दिल्ली -हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. बलात्कारी बाबाच्या गुहेत साध्वींना 'बाबाच्या माफीसाठी मजबूर केले जायचे. या माफीचा अर्थ म्हणजे राम रहीमशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे असायचा.
 
'बाबाची माफी' हा शब्द दुसऱ्या साध्वींकडून ऐकला...
- दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी बाबाला 20 वर्षांची कैद झाली. या बाबाच्या आश्रमातील - डेऱ्यातील एक निवासस्थान गुफा म्हणून ओळखले जाते.
- ही गुफा हरियाणाच्या सिरसा शहराजवळील डेरा सच्चा सौदाच्या 600 एकर परिसरात पसरलेली आहे.
- राम रहीमला त्याचे भक्त पिताजी म्हणायचे. एका बलात्कार पीडितेने कोर्ट आणि सीबीआयला सांगितले की, तिने 'पिताजीची माफी' हा शब्द इतर साध्वींकडून ऐकला होता.
- पीडितेच्या जबाबाआधारे म्हटले गेले की, इतर साध्वी नेहमी तिला विचारायच्या की पिताजीची माफी मिळाली आहे का? त्यांना विचारले की माफीचा काय अर्थ आहे, यावर त्या सगळ्या हसायच्या. बाबा डेऱ्यामध्ये राहणाऱ्या समर्पित साध्वींना पवित्र करण्याच्या नावाखाली माफी द्यायचा, म्हणजेच रेप करायचा.
- जबाबानुसार, पीडितेने म्हटले की, बाबा स्वत:ला देव असल्याचे सांगायचा.
- साध्वीने असाही खुलासा केला की, बाबाचे चेलेही बलात्कारासाठी 'पिताजी की माफी' हा शब्द वापरायचे. जेथे बाबा राहायचा, तेथे फक्त महिला अनुयायी तैनातीला असायच्या.
 
#28 ऑगस्ट 1999 च्या रात्री नेमके काय झाले?
कोर्टात साध्वीच्या जबाबावरून वकिलाकडून सांगण्यात आले की, डेरा प्रभारी सुदेशने 28 ऑगस्ट 1999 च्या रात्री गुफेमध्ये राम रहीमकडे तिला नेले.
- यादरम्यान राम रहीम तिला म्हणाला की, तुझ्या आधीच्या कर्मामुळे तू अपवित्र झाली आहे आणि मी साक्षात परमेश्वर असून तुला पवित्र करणार आहे.
- त्या रात्री राम रहीम आपल्या आलिशान खोलीत टीव्ही सेटवर पोर्न फिल्म पाहत होता. तिथे साध्वी पोहोचताच त्याने बंदुकीच्या धाकाने तिच्यावर रेप केला.
- रेप केल्यानंतर राम रहीमने पीडितेला म्हटले की, जर तिने कोणाला काही सांगितले, तर तिच्या कुटुंबाला जिवे मारण्यात येईल.
- यानंतर ती डेऱ्यातील शिबिरातच राहिली. 133 साध्वींपैकी 24 जणींनी 1997 ते 2002 दरम्यान डेरा कायमचा सोडला.
- वास्तविक, 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक गुमनाम चिठ्ठी लिहिण्यात आली होती. या चिठ्ठीत डेऱ्यातील साध्वीने बाबावर बलात्काराचा आरोप केला होता.
- या चिठ्ठीची एक प्रत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टालाही पाठवण्यात आली होती. यात स्पष्ट लिहिण्यात आले होते की, कशा प्रकारे शक्तिशाली बाबा त्यांच्यावर आणि डेऱ्यातील इतर महिलांवर आपल्या गुफेमध्ये रेप करायचा.
- सीबीआयने 2002 मध्ये 18 साध्वींवर बलात्काराचा खुलासा समोर आल्यावर प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

Next Article

Recommended