आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर-भावजयीच्या \'भानगडी\'त जवानाचा गेला बळी, लेह-लडाखमधून नुकताच सुटीवर आला होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत जवान हरप्रीत सिंग. त्यांच्या पत्नीने आणि चुलत भावानेच त्यांची हत्या केली. - Divya Marathi
मृत जवान हरप्रीत सिंग. त्यांच्या पत्नीने आणि चुलत भावानेच त्यांची हत्या केली.
अमृतसर - पोलिसांनी 10 दिवसांपूर्वीच सुटीवर आलेल्या जवानाच्या खुनाचा उलगडा केला आहे. खून जवानाच्या पत्नीने आणि जवानाच्या चुलत भावाने आपले अवैध लैंगिक संबंध लपवण्यासाठी केला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
 
असे आहे प्रकरण...
- एसएसपी डी.एस. मान म्हणाले की, 31 ऑगस्टला फतेहपूरच्या बदेशा गावातील धर्म सिंगने पोलिसांत तक्रार दिली की, त्यांचा मुलगा हरप्रीत सिंग (32) जो लेह लडाखमध्ये तैनात असतो तो 29 ऑगस्टला सुटी घेऊन घरी आला होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह वेगळ्या घरात राहायचा.
- 31 ऑगस्टच्या पहाटे 5.30 वाजता हरप्रीतची पत्नी लवप्रीत कौरने फोन करून सांगितले की, रात्री 12 वाजताच तिचा पती मित्राकडे चाललो असे म्हणून गेला, पण परत आलाच नाही. 
 
असा लावला छडा
- त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता जवानाचा मृतदेह एका कालव्याजवळ आढळला. त्यांची कारही जवळच उभी केलेली होती. 
- कारच्या काचा फुटलेल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी अज्ञाता खुन्याविरुद्ध केस नोंदवून तपास सुरू केला. 
- तपासादरम्यान डीएसपी डी. प्यारा सिंग आणि इन्स्पेक्टर प्रीतइंदर यांनी मृत जवानाच्या पत्नीची चौकशी केली असता, अगोदर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु ती गोंधळलेली असल्याचे दिसताच तिला पोलिसी हिसका दाखवला. मग मात्र तिने कबूल केले की, तिने आणि तिच्या चुलत दिरानेच जवान हरप्रीत सिंगला फासावर लटकवून खून केला.  दोघांमध्ये 5 वर्षांपासून अवैध लैंगिक संबंध सुरू होते.
 
यामुळे जवानाचा केला खून
- हरप्रीत लवकरच लष्करातून निवृत्त होऊन घरी परतणार होता. म्हणून पुढे चालून त्यांच्या संबंधात अडथळा येईल या कारणाने त्यांनी हरप्रीतला संपवले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून फाशीसाठी वापरलेली ओढणी, मोबाइल फोन जप्त केला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
 
पुढच्या स्लाइडवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये घटनाक्रम आणि आरोपी...
बातम्या आणखी आहेत...