आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पत्नीतला रस संपला, तो घेऊन आला सुंदर सवत; मग असे झाले हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - 14 सप्टेंबर म्हणजे हिंदी दिवस. हिंदी साहित्याचा उल्लेख होताच सर्वात आधी प्रेमचंद यांचे नाव ओठांवर येते. प्रेमचंद त्यांच्या कथांमध्ये सामाजिक समस्या आणि नातेसंबंधांची अशी काही पेरणी करायचे की, सर्वांना एक नवा बोध मिळायचा. divyamarathi.com आपल्या वाचकांना हिंदी दिवसाच्या या औचित्यावर या महान साहित्यिकाच्या काही कहाण्या संक्षिप्त स्वरूपात सांगत आहे.
 
आर्थिक ओढाताणीत जगले प्रेमचंद, विकावी लागली लिहिलेली पुस्तके
- प्रेमचंद्र यांचा जन्म 31 जुलै 1880 मध्ये झाला. त्यांचे दुसरे नाव धनपत राय आणि वडिलांचे नाव अजायब राय होते.
- ते 8 वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. 15 वर्षांच्या वयात त्यांचे लग्न झाले, परंतु लिखाणातून एवढी कमाई होत नव्हती की, पत्नीला सर्व सुविधा देता येतील. एक वेळ तर अशी की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुस्तकेही विकावी लागली.
- सर्व अडचणींशी संघर्ष करत त्यांनी वाराणसीमध्ये प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. मुले मोठी झाल्यावर ते त्यांची प्रेस विकून इलाहाबादमध्ये शिफ्ट झाले.
- प्रेमचंद यांची नमक का दरोगा, ईदगाह, पंच परमेश्वर, बडे भाई साहब, पूस की रात, शतरंज के खिलाडी आणि कफन या कथा विश्वसाहित्याचा भाग बनल्या आहेत. याशिवाय सौत, दो बैल आणि मैकू यासारख्या कथा आजही लोकांना आकर्षित करतात.
 
अशी होती मुन्शी प्रेमचंद यांची 'सौत' (सवत)
- रजियाला 2-3 मुले होऊन मरतात आणि तिचे वय वाढत जाते, तेव्हा रामूचे तिच्यावरील प्रेम कमी होऊ लागते. तो दुसऱ्या लग्नाच्या मागे लागतो. रोज-रोज रजियाशी त्याची भांडणे होऊ लागली. रामू काहीतरी कारण शोधायचा आणि रजियाशी भांडण करून मारझोड करायचा. 
- शेवटी तो नवी पत्नी घेऊनच येतो. तिचे नाव असते दासी. उजळ रंग, मोठेमोठे डोळे आणि अगदी तरुण अशी.
- या नवयौवनेच्यापुढे फिक्या पडलेल्या रजियाचा काय टिकाव लागणार होता? तरीही ती तिच्या स्वामित्वाला आपल्या अधिकारात ठेवू इच्छित होती. 
 
सवत घरात आल्यावर रजियाने कसे सांभाळले पतीला, पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा पूर्ण स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...