आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे \'हनीप्रीत\'ची सीक्रेट डायरी, लिहिली प्रेम-विरह आणि दु:खाची दर्दभरी कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - साध्वी बलात्कारप्रकरणी राम रहीम रोहतक जेलमध्ये 20 वर्षांची कैद भोगत आहे. परंतु बाबाची मानलेली मुलगी हनीप्रीत अजूनही फरार आहे. हरियाणा पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आतापर्यंत हनीप्रीतचा ठावठिकाणा लागलेला नाही. यादरम्यान हनीप्रीत आणि बाबा राम रहीमचे हैराण करणारे किस्से समोर आले आहेत. एका टीव्ही चॅनलला हनीप्रीतची 19 वर्षे जुनी सीक्रेट डायरी मिळाली, ज्यात तिने आपल्या काळजातले, जिव्हाळ्याचे विषय मांडलेले आहेत.
 
हनीप्रीतच्या डायरीमुळे उलगडेल रहस्य...
- एका टीव्ही चॅनलनुसार हनीप्रीतने ही डायरी 19 वर्षांआधी लिहिली होती. हनीप्रीतने या डायरीत तिच्या काळजातल्या गूढ गोष्टी नमूद केलेल्या आहेत.
- प्रियंका तनेजाची ही डायरी 1998ची म्हणजेच तिच्या लग्नाच्या 1 वर्षाआधीची आहे. हनीप्रीतची ही डायरी तब्बल 103 पानांची आहे.
- या डायरी हनीप्रीतची आहे, परंतु दैनिक भास्कर याची खात्री देत नाही की, हे सर्व हनीप्रीतने लिहिले आहे.
 
सलमान आणि काजोलची फॅन आहे हनीप्रीत
- हनीप्रीतची ही डायरी उघडताच सर्वात पहिल्या पानावर भारताचा एका नकाशा दिसतो.
- डायरीच्या दुसऱ्या पानावर लिहिले आहे, प्रियंका तनेजा ऊर्फ ANU. हनीप्रीत स्वत:ला अनु म्हणायची.
- तिसऱ्या पानावर जाताच त्यावर अॅक्ट्रेस काजोलची फोटो लावलेला आहे. त्यावर लिहिले आहे How Sweet. यावरून कळते की ती काजोलला किती पसंत करत होती.
- डायरीनुसार, हनीप्रीत त्या काळच्या सर्व बड्या अॅक्ट्रेसची चाहती होती. मग ती तब्बू असो वा काजोल.
- डायरीच्या 4थ्या पानावर सलमान खानचा चित्रपट 'जब प्यार किसी से होता है'चे पोस्टरही लावलेले आहे. ती सलमानची खूप मोठी चाहती होती.
- हनीप्रीत सलमान खानशिवाय शाहरुख खान, आमिर खानचीही चाहती होती. त्यांचे फोटोजही तिच्या डायरीत आढळले आहेत.
- यावरून एकंदरीत कळते की, ती चित्रपटांची चाहती होती. म्हणूनच राम रहीमसोबतही तिने चित्रपटांत काम केले होते.
 
डायरीत आहेत ही नावे
- हनीप्रीतने तिचे निक नेम ANUचे पूर्ण विवरण दिले आहे. A- attractive, N-naughty, U-unfortunately Girl.
- या डायरीत हनीप्रीतचे वडील विश्वास गुप्ता, तिची छोटी बहीण निशू तनेजा आणि भाऊ साहिल तनेजा यांची नावे आहेत.
- डायरीत हिंदी आणि इंग्रजीत कविता लिहिलेल्या आहेत. हनीप्रीतने या डायरीत शेरोशायरीच्या माध्यमातून तिच्या मनीज गूज मांडले आहे.
- बाबाच्या या मानलेल्या मुलीने राम रहीमसाठीही एक खास गीत लिहिलेले आहे. हे वाचून कळते की राम रहीमने हनीप्रीतच्या हृदयावर पूर्णपणे ताबा मिळवलेला होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, बलात्कारी राम रहीमच्या हनीप्रीतची पर्सनल डायरी...
बातम्या आणखी आहेत...