आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा तरी हनीप्रीतला भेटू द्या, बलात्कारी बाबाचा तुरुंगात हा एकच धोशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - साध्वी बलात्कारप्रकरणी राम रहीम रोहतकच्या तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. परंतु, बाबाची सर्वात खास आणि पावलापावलावर सोबत करणारी हनीप्रीत अद्याप फरार आहे. गुरमित तुरुंगात जाऊन 13 दिवस झाले आहेत आणि त्याने एकच हट्ट चालवला आहे की, एकदा तरी हनीप्रीतला भेटू द्या.
 
हनीप्रीतचा नवऱ्याने केले आरोप, बाबाचे आणि हनीप्रीतचे अवैध लैंगिक संबंध
- बाबा आणि हनीप्रीतच्या नात्यांबद्दल अनेक तऱ्हेचे किस्से समोर येत आहेत. कधी काही तर कधी काही ऐकायला मिळत आहे.
- हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ताने तर जाहीर आरोपच केला की, राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये अवैध शारीरिक संबंध आहेत.
- राम रहीम तिला मानलेली मुलगी असल्याचे सांगतो, तिला लग्नाआधीच दत्तक घेतल्याचे म्हणतो.
- हनीप्रीत मात्र बाबाला कधी भाई असल्याचे सांगते, तर कधी पिता! दोघांमध्ये नेमके काय नाते आहे ते ती सापडल्यावरच समोर येईल.

बाबाची एवढी खास होती हनीप्रीत
- बाबाची हनीप्रीत एवढी खास होती की ज्या दिवशी राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आली होती, त्या दिवशीही ती कोर्टात बाबासोबत होती.
- एवढेच नाही, हनीप्रीत बाबासोबत हेलिकॉप्टरमधून पंचकुला ते रोहतक जेलपर्यंत बाबासोबत गेली होती.
- हनीप्रीतवर असाही आरोप आहे की, तिने बाबाला तुरुंगातून पळवण्याचा कट रचला होता. तिने दंगे भडकावल्याचाही आरोप आहे.
बाबा प्रत्येक निर्णयावर हनीप्रीतचा घ्यायचा सल्ला
- असे सांगितले जात आहे की, राम रहीम एखादा निर्णय घेतल्यावर हनीप्रीतला आवर्जून विचारायचा.
- बाबाच्या या मानलेल्या मुलीच्या हातातच डेऱ्याच्या सर्व किल्ल्या होत्या. डेऱ्यात तिचाच शब्द ऐकला जायचा.
- हनीप्रीत बाबाची खासमखास होती. नेहमी बाबासोबत फिरायची.
- बाबा तिला सोडून कुठेच राहत नव्हता.
 
>शाळेच्या दिवसांतच झाली होती बाबा आणि हनीप्रीतची भेट
- काही दिवसांपूर्वी हनीप्रीतच्या शेजाऱ्याने दावा केला आहे की, राम रहीमची हनीप्रीत ऊर्फ प्रियंका तनेजाची भेट शाळेच्या दिवसांतच झाली होती.
- शेजाऱ्याने सांगितल्यानुसार, हनीप्रीत राम रहीमच्या संपर्कात लग्नाच्या खूप दिवसांपूर्वीच आली होती, फतेहाबादमध्ये तिच्या साखरपुड्यालाही बाबा हजर होता.
- शेजारी म्हणाला, हनीप्रीतच्या साखरपुड्याला बाबाची उपस्थिती असल्याने हनीप्रीतच्या घरासोबतच मेन हायवेलाही सजवण्यात आले होते.
- राम रहीम हनीप्रीतच्या साखरपुड्याला एका टू-सीटर बीएमडब्ल्यू गाडीत आला होता. विधी पूर्ण झाल्यावर त्याने या गाडीतच हनीप्रीतला डेऱ्यामध्ये सोबत नेले. यानंतर हनीप्रीतचे लग्न डेऱ्यामध्येच पार पडले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राम रहीम आणि ग्लॅमरस हनीप्रीतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...