आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनीप्रीतला 8 SIT ने 5 राज्यात 1000km शोधले, सापडली पंचकुलापासून 10 किमी अंतरावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनीप्रीतची पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केली. - Divya Marathi
हनीप्रीतची पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केली.
पंजकुला - राम रहिमची कथित कन्या हनीप्रीतला हरियाणा पोलिसांनी मंगळवारी पंजाबातून अटक केले. तिला बुधवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. मंगळवारी पोलिसांनी तिची साडे चार तास कसून चौकशी केली. आयजी ममत सिंह आणि आयजी ए.एस. चावला प्रश्नांची एक यादी घेऊनच चंडीमंदिर पोलिस स्टेशनला पोहोचले होते. त्यांच्यासोबत एक कॅमेरामॅन होता. त्याने सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या. राम रहिमला 25 ऑगस्टला साध्वींच्या बलात्कार प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर बाबाला पोलिसांनी हेलिकॉप्टरने रोहतकला नेले, त्यावेळी हनीप्रीत त्याच्यासोबत होती. बाबाला सुनारियाच्या तुरुंगात टाकल्यानंतर हनीप्रीत फरार झाली. 39 दिवसानंतर हनीप्रीत मंगळवारी मीडिया समोर आली होती. तिच्यावर दंगल भडकवण्यासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. 
 
पंचकुलापासून अवघ्या 10 किलोमीटर दरम्यान पकडली गेली हनीप्रीत
- - पंचकुला पोलिस आयुक्त पी.सी. चावला म्हणाले, हनीप्रीतला पटियाला ते जीरापूर येथून अटक करण्यात आली आहे. तिच्या सोबत आणखी एक महिला होती. तिचे नाव आताच उघड करता येणार नाही. आजपासून तिची चौकशी सुरु होईल. उद्या हनीप्रीतला कोर्टात हजर केले जाईल. 
- 'हरियाणा एसआयटीचे एसीपी मुकेश यांना माहिती मिळाली होती की हनीप्रीत इनोव्हा कारने प्रवास करत आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता दरम्यान तिला अटक करण्यात आली. चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. ते तिची चौकशी करतील. आदित्य आणि पवन इन्सा यांचा अद्याप शोध सुरु आहे.'
- हनीप्रीतच्या शोधात पंचकुला पोलिसांच्या 8 एसआटीने 5 राज्यांमध्ये छापेमारी केली. जवळपास तिच्या शोधात पोलिसांनी 1 हजार किलोमीटर अंतर कापले मात्र प्रत्येक छाप्यात त्यांच्या हाताला काहीही लागले नाही आणि अखेरीस पंचकुलापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर ती पकडली गेली. 
- पंचकुलामध्ये 25 ऑगस्ट रोजी भडकलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली. त्यात समोर आले की याचे संपूर्ण षडयंत्र हनीप्रीतने रचले होते. 
 
हनीप्रीतच्या छातीत दुखायला लागले 
- हनीप्रीतला अटक केल्यानंतर दिवसभर तिची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री दीड वाजता तिने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिस तिला पंचकुला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. 
- हनीप्रीतने डॉक्टरांना सांगितले की मायग्रेनची औषधी सुरु आहे. डॉक्टरांनी चेकअप केले, ईसीजी नॉर्मल आला. 
 
उशिरा रात्रीपर्यंत सुरु होती चौकशी 
- हनीप्रीतच्या चौकशीनंतर रात्री उशिरा तिने दिलेला जबाब पडताळून पाहाण्यात आला. पोलिस आयुक्त चावलांनी दोन महिला उप निरीक्षक, एसआयटी इंचार्ज मुकेश मल्होत्रा, चंडीमंदिर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांची पोलिस स्टेशनमध्ये ड्यूटी लावली आहे. 
 
आतापर्यंत पकडलेले आरोपी 
- दिलावर, सुरेंद्र धीमान, चमकौर, गोविंद, दान सिंह, खरैती लाल आणि हनीप्रीत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोलिसांनी हनीप्रीतला काय प्रश्न विचारले...
बातम्या आणखी आहेत...